महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
दिनांक:- १० जुलै, २०२३.
आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय: पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसह बिगर इंग्रजी माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळांवर शासन निर्णय, दिनांक १९.०६.२०१३ मधील तरतूदीनुसार इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका (डिएड/डी.टिएड) प्राप्त शिक्षकांची प्राधान्याने उपलब्धता करुन घेणेबाबत.
संदर्भ : १) शासन निर्णय, क्रमांक पीआरई-१७१३/(८६/१३)/प्राशि-५, दिनांक १९.०६.२०१३.
२) शासन निर्णय, क्रमांक सीईटी-२०१८/प्र.क्र.२०३/टिएनटि-१,
दिनांक २७.०६.२०१८.
३)संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र क्रमांक राशैसंप्रपम/अविवि/अभिप्राय/२०२२-२३/२५१४,
दिनांक २६.०५.२०२३.
४) उपसंचालक (प्रशासना, शिक्षण आयुक्तालय, पुणे यांचे पत्र क्रमांक आशिका/आस्था-क १०६ / सेम. ई-डीएड-आर / २०२३/३४०३,
दिनांक ३१.०५.२०२३.
२. बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी शाळा सुरु करण्यास परवानगी देताना, संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णय, दिनांक १९.६.२०१३ मधील अट क्रमांक ३- सेमी इंग्रजी शाळेकरीता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका (डिएड/डी.टिएड धारक असणे आवश्यक राहील, अशी अट शासनाने विहीत केली आहे. त्यामुळे अशाप्रकारे तरतूद विहीत असताना केवळ अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्याने इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका धारक शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे यापुढे इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका धारक शिक्षकाअभावी कोणतीही सेमी इंग्रजी माध्यम शाळा बंद पडणार नाही यांची दक्षता सक्षम प्राधिकारी यांनी घ्यावी. तसेच, अशा सेमी इंग्रजी शाळांमध्ये शासन निर्णय, दिनांक १९.६.२०१३ मध्ये विहीत उपरोक्त नमूद अटीनुसार मंजूर पदांपैकी किमान एका इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविकाधारक (डिएड/डी. टिएड) शिक्षकाची नियुक्ती झाल्याची खातरजमा करावी. याप्रमाणात असे शिक्षक उपलब्ध नसल्यास, जेवढ्या सेमी इंग्रजी शाळा •असतील किमान तेवढे इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविकाधारक (डिएड/डी. टिएड) शिक्षक उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची असल्याने, चालू भरती प्रक्रिया - २०२२ पासून अशा शिक्षकांची मागणी नोंदवून ती प्राधान्याने उपलब्ध करून घेणे अनिवार्य आहे. त्या दृष्टीने तशी मागणी पवित्र पोर्टलवर नोंदविण्यासंदर्भात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थासह बिगर इंग्रजी माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळेच्या संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरुन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. असा शासन निर्णय पारित केला आहे.
शैक्षणिक दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments