शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा
नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा
(इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळातील विद्याथ्र्यांची
बाचणी होणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल. सदर वाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाण नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये याण्यांचा मुख्य उदेश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती-
कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे. पायाभूत चाचणी उद्देश/ उपयोग /फायदे :-
१) विद्यार्थ्याची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे.
२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल. ३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल.
४) अध्ययनात मागे असणा या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे
अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.
(५) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होईल.
ॐ तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या (PAT) संभाव्य कालावधी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचणी प्रकार
अ. क्र.कालावधी
१ पायाभूत चाचणी माहे ऑगस्ट २०२३ तिसरा आठवडा
२ संकलित मूल्यमापन चाचणी माहे ऑक्टोबर २०२३ शेवटचा आठवडा किंवा माहे नोव्हेंबर पहिला आठवडा २०२३
सत्र १ माहे एप्रिल २०२४ पहिला / दुसरा आठवडा
संकलित मूल्यमापन चाचणी,
सत्र २ मूल्याकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
पायाभूत चाचण्यांचे माध्यम व विषय:
सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
● चाचणीचा अभ्यासक्रम :
मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती /मुलभूत क्षमता यावर आधारित असेल,
0 Comments