Subscribe Us

यशोगाथा जि प बोराखेडी शाळेची

 

                यशोगाथा जि प बोराखेडी शाळेची 

Anil Chavhan H.M. 

AttachmentsWed, Jun 24, 2020, 3:23 PM

*ध्येयपूर्तीतुन रोवल्या जाते उपक्रमशिल शिक्षणाची मुहूर्तमेढ मुख्याध्यापक अनिल चव्हाण......  आंतरराष्ट्रीय जि प शाळा 
बोराखेडी  सन 2017/18 व 2019/20 मधे अपार मेहनतीने मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी बोराखेडी शाळेला आय 
एस ओ व आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून  3 ते 5 वयोगटातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमामुळे  गरीब
 वंचित ,शेतकरी विद्यार्थ्यांना मोठ्या कॉन्हव्हेटमधे ( इंग्रजी शाळेत) अमाप फि भरून शिक्षण न घेता आपल्या जवळच्या
 जि प शाळेत दर्जेदार शिक्षण मिळावे याच शुद्ध हेतुने शाळेतील गरीब वंचित विद्यार्थ्यांसाठी नविन अभ्यासक्रमाची संधी
 निर्माण केली... आंतरराष्ट्रीय शालेय अभ्यासक्रम अमलबजावणी मुळे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात  येणारा अभ्यासक्रमात
 कृतीयुक्त अध्यापणावर व कौशल्यावर भर असुन पारंपरिक खेळ, कला ,संगीत,संस्कृत, अतुल्य भारत , पर्यावरण, विज्ञान
, प्रत्यक्ष अनुभव, सर्जनशीलता तसेच मातृभाषेतून शिक्षण देण्यात यावा यावर जास्त भर देत नर्सरीपासुनच आंतरराष्ट्रीय 
अभ्यासक्रमाची अमलबजावणी केली .
                          मोताळा तालुक्यातील आंतरराष्ट्रीय  बोराखेडी शाळेत विद्यार्थांना गुणवत्ते बरोबर
  कलागुणांना उपक्रमांना भरपूर वाव दिल्या जाते. नर्सरी, केजी -1 ,केजी-2 पासुन गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात
 सहभागी करून  शाळेच्या गुणवत्तेत अमुलाग्र बदल घडविण्यासाठी मुख्याध्यापक अनिल चव्हाण व शिक्षक यांनी विशेष
प्रयत्न केले आहे. कृतीयुक्त प्रत्यक्ष अध्यापण पद्धती,ज्ञान रचनावादी अध्यापण ,विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, सामान्य ज्ञान
 स्पर्धा परीक्षा, चित्रकला स्पर्धा, विद्यार्थी गुणवत्ता कौशल्य वाढीसाठी प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन प्रत्येक नाविन्यपूर्ण
उपक्रमात प्राविण्य प्राप्त करत अनेक जिल्हा स्तरावरील बक्षीस मिळवत आज ग्रामीण भागातील या शाळेने खुप मोठे यश
 संपादन केले आहे. यामुळे शाळेने स्वच्छ शाळा पुरस्कार, ज्ञानरचनावादी शाळा पुरस्कार,उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार,
 राज्य शिक्षक पुरस्कार,आय एस ओ शाळा, आंतरराष्ट्रीय शाळा, अशी अनेक प्रशस्तीपत्र राज्यपाल, शिक्षणमंत्री, पालकमंत्री,
 जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते या शाळेला मिळाली आहे. जिल्ह्यातील एक माँडेल शाळा म्हणून
 बोराखेडी शाळा उदयास आली असुन आजपर्यंत 5 हजार पेक्षा जास्त शिक्षक , शाळा समीती व जिल्ह्यातील अधिकारी यांनी
बोराखेडी शाळेला भेटी देऊन समाधान व्यक्त केले आहेत.
                  सरपंच, शाळा समिती,गावकरी यांच्या मदतीने तसेच परिसरातील दानशूर लोकांच्या योगाने लोकवर्गणीतून 
ग्रामीण भागातील शाळा एक आदर्श शाळा म्हणून नावारूपाला आली आहे .बोराखेडी शाळा आदिवशी वस्तीमध्ये 
 असुनही निसर्गरम्य सौंदर्य सृष्टीने नटलेली  मनमोहक वातावरण निर्मिती करून एखाद्या खाजगी ईंग्रजी शाळेपेक्षाही आकर्षक
 डिजीटल सुविधायुक्त अशी शाळा गरीब वस्तीत निर्माण केली असुन पालकांचे व भेट देणाऱ्या व्यक्तीचे मन वेधुन घेत आहे.
 आंतरराष्ट्रीय शाळेत राबवित असलेल्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मिळणारे संस्कारक्षम कौशल्यपुर्ण ज्ञान पाहुन संपुर्ण पालक
 व शाळा समिती आनंद व्यक्त करत आजुबाजुच्या खेड्यातील 200 विद्यार्थी गुणवत्तेच्या दृष्टीने सदर शाळेत प्रवेश घेत आहे.
 राबविलेल्या प्रत्येक उपक्रमात बोराखेडी शाळेतील प्रत्येक शिक्षक सहभागी होऊन योगदान देतात,तसेच शाळास्तरावरील
 शैक्षणिक कार्य असो वा सहशालेय उपक्रम यशस्वी करण्यासाठी  विशेष कामगिरी करत आहे. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी
 येत नाही अशी नेहमी ओरड होत होती परंतु बोराखेडी शाळेतील शिस्तबद्ध  गुणवत्ता पुर्ण शैक्षणिक कार्यामुळे आज रोजी 450
 एवढ्या वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे विद्यार्थ्यांना बसायला  वर्गखोल्या व मैदान कमी पडत आहे . वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे वर्ग
 कमी पडत आहे . हि समस्या मागिल सत्रापासून  मुख्याध्यापक यांना सप्टेंबर-2020-21  मध्ये निर्माण झाली. शाळेला जागा
 मिळण्यासाठी मुख्याध्यापक सातत्याने धडपडत होते. शाळेला लागूनच खाजगी मालकीची 12 गुंठ्ठे जागा होती ही जागा 
शाळेला मिळाली तरच  शाळेचे व विद्यार्थी विकासाचे स्वप्न पुर्ण होणार होते हे मुख्याध्यापक यांना ज्ञात होते."एकच ध्यास
 शाळेचा विकास" या उक्ती प्रमाणे मुख्याध्यापक हे शाळेला जागा मिळावी यासाठी सातत्याने धडपड करत होते सरपंच व 
गावकरी यांच्या संपर्कात राहुन जागा मालकांना सातत्याने विनंती सुरू होती . शेवटी निस्वार्थ भावनेने दुसऱ्या साठी जर 
आपण कितीही अवघड काम असले तरी ते पुर्ण होतेच आणि जुन महीन्यात सदर मालकाने 12 गुंठ्ठे जागा शाळेला दान
दिली व मुख्याध्यापकांचे आंतरराष्ट्रीय शाळेच्या विकासाचे स्वप्न पुर्ण झाले. यासाठी सरपंच सुरेश गर्दे यांनी मुख्याध्यापक 
यांना खुप मदत केली. नर्सरी पासुन च आंतरराष्ट्रीय शालेय अभ्यासक्रम अमलबजावणी मुळे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात 
 येणारा अभ्यासक्रमात स्वयंअध्ययनावर जास्त भर देत आज लाँकडाऊनच्या काळातही आँनलाईन शिक्षण, YOU TUB
 CHANNEL, शाळेची वेबसाईट, घरोघरी जाऊन शिक्षण  या उपक्रमांच्या  माध्यमातून सातत्याने गरीब  वंचित 
 विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे . शाळेतील विद्यार्थ्यांना आँनलाईन व कृतीयुक्त शिक्षण 
मिळत आहे. तसेच नविन शैक्षणिक सत्रातील प्रवेशासाठी घरोघरी जाऊन पालक भेटी घेऊन  प्रवेश  दिले  आहे .
 कोरोना महामारितील लाँकडाऊन च्या काळात घरी राहून स्वयंअध्ययन, उतारावाचन ,प्रश्नावली, आकारीक चाचणी,
 वाचन लेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य करण्याचे नियोजन तयार केले आहे.तसेच
 उन्हाळ्याच्या सुट्टीत रंगरंगोटी करून शौचालय, हँडवाँशस्टेन, वाँटर टँक , या सुविधा सज्ज करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय
 शिक्षण मंडळ रद्द करण्यात आले असतांना सुद्धा सन 2020-21 या सत्रात  वाढती  विद्यार्थी  संख्या हे या शाळेचे सर्वात मोठे 
यश आहे. अशाच प्रकारे जिल्हा परिषद  शिक्षकांनी ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे
 तेंव्हाच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व गुणवत्ता  टिकेल व गरीब वंचित, शेतकरी विद्यार्थ्यांना योग्य न्याय देता येईल . या 
यशाबद्दल सरपंच सुरेश गर्दे, शाळा समिती अध्यक्ष किशोर चहाकर व सर्व  सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक , शिक्षक
 महेंद्र तायडे,सौ रजनी बांगर सौ अनुप्रिता व्याळेकर, सौ सुनिता हुडेकर,सौ वामिंद्रा गजभिये,सौ सिमा गोरे,सौ  श्रीमती सुनिता
 न्हावकर, संध्या नाईक ,जया चव्हाण, शितल तायडे,दिपाली सोनवणे, अंकिता हिरळकर मंगला मालठणकर,यांचे अमुल्य 
योगदान महत्त्वपूर्ण आहे.*             
*अनिल चव्हाण (राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त) उच्च श्रेणी मुख्याध्यापक आंतरराष्ट्रीय जि प शाळा बोराखेडी मोताळा*
2 Attachments
 
 





Post a Comment

1 Comments

  1. खूप छान पथदर्शी उपक्रम पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....

    ReplyDelete