Subscribe Us

फुलाविना बाग सुनी*... *मुलाविना शाळा..*

 


Anil Chavhan H.M.



AttachmentsAug 3, 2020, 9:31 AM
*फुलाविना बाग सुनी*... *मुलाविना शाळा..*


     *दरवर्षी प्रमाणे शाळा सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर जाऊन संपूर्ण शाळा वर्ग खोल्या व परिसर स्वच्छ केला,अक्षरक्ष:सर्व डेक्स बेंच
 वर्ग धुऊन काढले.*   *बस मनात एकच आनंद  आता उद्यापासून शाळेची घंटा वाजेल, लाऊडस्पिकरवर सकाळच्या लगबगित,मधुर
 संगीताच्या तालावरील शैक्षणिक गाण्यावर डोलत डोलत  चिमुकली मुल शाळेत येतील  व परत तो किलबिलाट सुरू होऊन शाळा बहरून
 येईल असा आनंद मनात ओसांडून वाहत होता.* 

*शाळेचा पहिला दिवस नवीन शैक्षणिक सत्र शाळाप्रवेश उत्सव दरवर्षी प्रमाणे सर्व शिक्षकवृंद नविन कपडे घालून हातात पुष्पगुच्छ घेऊन 
नवीन  विद्यार्थ्यांच्या स्वागताची वाट बघत कार ,ट्रँकटर बैलगाडी,फुगयांनी फुलांनी सजवत लेझीम ठोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक
  काढण्यात दंग होऊन लग्नसोहळ्यापेक्षाही वेगळा आनंद द्विगुणित होईल असा तो प्रसंग* .. . *आहाहा काय तो रोजचा सुमधुर संगीतमय 
परिपाठ  चिमुकल्यांनी गच्च भरलेल मैदान एकाग्र होऊन आनापानात बसलेले
 ध्यानात मग्न होऊन बसलेले बालकरूपी पाखर बघुन मन अगदी प्रसन्न व्हायचं  ....                   

   यावर्षी  शाळेचा पहिला दिवस ना घंटा ना स्पिकरचा आवाज, ना नविन कपडे घेतले ना पुष्पगुच्छ ना कार ना बैलगाडी ना ठोलताशा ना
 स्वागत ना शाळाप्रवेश उत्सव....*  

*आज सगळी चिमुकली पाखर हरवल्या सारखी वाटते..*. *ज्या प्रमाणे मोबाईल च्या मोठमोठ्या टावरने पक्षी पाखर हरवली तशीच या कोरोणा
 महामारीने शाळेतील चिमुकली बालकं तर हरवणार नाही ना असा प्रश्न सतत मला पडत आहे...*
*ना चिमुकल्यांची किलबिलाट, ना परिपाठ ना सुमधुर संगीत संपूर्ण शाळा ओसाड पडलेली, या उदास शाळेला बघुन माझ्याही डोळ्यात पाणी
 आले*... *कारण शाळा  उदास रडक्या चेहऱ्याने त्या चिमुकल्या पावलांनी थयथय नाचत येणाऱ्या बालकांची वाट बघत आहे ,उदास मनाने 
शाळा मुलं आता येतील, थोड्या वेळाने येतील माझी चिमुकली मुल कधी येणार या आशेने तिच्या डोळ्यांतील पाणी सुद्धा आटत चाललय
सतत एकटक डोळे लावून मुलांची वाट बघत आहे.*  ........ *जणू एकटा नवरदेव मंडपात पोहचला व वर्हाडाचे रस्त्यावर वाहन कोसळावे
 असा तो भयानक क्षण झालाय..*

*खर तर आजही  आम्ही नेहमीप्रमाणे घरून शाळेत जाताना खुप आनंदाने जातो पण शाळेत गेल्यावर ती नेहमीप्रमाणे चिमुकल्यांनी 
बागडणारी शाळा जेंव्हा ओसाड दिसते ना तर मन अगदी सुन्न होऊन जाते.. आणि आमची पावले लगेच मुलांच्या घराच्या दिशेन पडतात.     ...                                          खर शाळेच सौंदर्य म्हणजेच मुलं आहे, विद्यार्थी रोज शाळेच्या मैदानातील कचरा झाडून स्वच्छता करतात घंटा वाजवतात,संगितमय परिपाठ म्हणतात म्हणजे शाळेला रोज नटून
 थाटून शृंगार करणे होय, सध्या शाळा भकास आहे कारण त्याची काळजी घेणारी चिमुकली घरी आहे, म्हणून तर शाळा रोज विद्यार्थी
 येण्या वाट बघते*

*आज अनेक प्रयोग सुरू आहेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पण .....त्या शाळेची माया ,तेथील रमणीय वातावरण, कठोर पण शिस्तप्रिय
 प्रेम, आपल्या मित्रांसोबत स्वछंद बागडण्याचा आनंद  शिक्षकांचे प्रेम मार्गदर्शन घरी नाही देऊ शकत आम्ही.... जेंव्हा आम्ही घरोघरी मुलांना 
अभ्यास देतो तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर शाळेतला तो आनंद बघायला मिळत नाही, त्यांच्या हिरमुसल्या चेहऱ्याला बघून वाटत कि ती मुल वाट
घताय शाळा सुरू होण्याची, आनंदाने बागडायची, सरांच्या मँडम च्या आजुबाजुला रेंगाळत शिकतांना विद्यार्थ्यांना एक वेगळाच आनंद मिळतो
 .या मुलांना जणू आता घरी राहण नकोस वाटत आहे. त्यांना त्या मोबाईल टीव्ही च्या स्क्रिन पेक्षा तो शाळेचा फळा आठवतोय, त्याला तो 
आत्मविश्वासाने सादर केलेला संगितमय परिपाठ आठवतोय.घरातील वडीलांच्या रोजच्या चिडचिड पेक्षा सरांनी दिलेला खाऊ त्यांच रागावण 
त्याला हवहवस वाटतंय...*
*विद्यार्थ्यांना जेंव्हा घरी भेटतो तेंव्हा त्या हिरमुसलेल्या मुखातून एकच अनुत्तरित प्रश्न ....सर शाळा कधी सुरू होते.. सर शाळा कधी सुरू होते .........*
.. *शाळा हि मुलांच्या जिवनातील एक अविभाज्य घटक आहेत. एखाद्या प्रसंगी त्याला ती नको वाटते पण शाळेविना विद्यार्थी आनंदात राहु पण
 शकत नाही*;*..... *एकीकडे विद्यार्थ्यांची सवय असलेली , शाळा विद्यार्थ्यांची सतत वाट बघत आहे व दुसरीकडे विद्यार्थी शाळा सुरू होण्याची 
वाट बघत आहे. ओसाड शाळेच रप व हिरमुसलेली बालकांची दशा काय म्हणाव या संयोगाला......*  *या विलक्षण अनुभवाला  मला एवढच 
म्हणावस वाटत...*
 *फुलाविना बाग सुनी मुलाविना शाळा.. मुलाविना शाळा.....*    
*अनिल चव्हाण राज्य शिक्षक पुरस्कृत मुख्याध्यापक जि प शाळा बोराखेडी*
Attachments area

Post a Comment

0 Comments