जागतीक पर्यावरण दिनाला वृक्षारोपण करून पर्यावरण बचाव जनजागृती..
आंतरराष्ट्रीय जि प शाळा बोराखेडी येथील मुख्याध्यापक अनिल चव्हाण हे सातत्याने जागतिक पर्यावरण
दिवस, कृषी दिन, वाढदिवस, जयंती उत्सवाला शालेय परिसरात तसेच शाळेबाहेर रस्त्याच्या दुतर्फा कडेला
वृक्षारोपण करत आहे. खर तर कोरोना काळात जागतिक पातळीवर आँक्सिजन आवश्यकता किती महत्त्वाची
आहे हे खेड्यापासुन तर शहरातील प्रत्येक कुटुंबातील लहान ,थोर मोठ्यांना यांचे महत्त्व समजले आहे. दुषित
पर्यावरणामुळे ओझोनच्या थराला इजा पोहोचत असुन तापमानात वाढ होत आहे, त्यामुळे उन्हाळ्यातील जनजीवन
विस्कळित होत आहे. त्यामुळे वृक्षारोपण ही काळाची गरज झाली आहे हे आता सर्वांना पटले आहे. 2013 पासुन
मुख्याध्यापक चव्हाण यांनी बोराखेडी मराठी शाळेच्या ओसाड मैदानावर वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली आणि
आज त्यावेळची ओसाड जागा वनराईने नटलेली शैक्षणिक दृष्ट्या निसर्गरम्य सुंदर मनमोहक परिसरात रूपांतर
झाली असुन स्वच्छ पर्यावरण ठेवत मोफत व भरपूर शुद्ध प्राणवायू देत आरोग्यास लाभदायक आहे.
सातत्याने काही प्रमाणात का असेना पण विशेष दिनाचे महत्त्व साधत वृक्षारोपण केल्याने स्वतः
पर्यावरणाची आवड जोपासत, सदर उपक्रमाला सोशल मीडिया, वर्तमान पत्रातून प्रसिद्ध देत जनजागृती करण्याचे
कार्य मुख्याध्यापक अनिल चव्हाण अविरत करत आहेत. विशेष म्हणजे आजपर्यंत 90% वृक्षांचे संवर्धन करण्यात
यश आले आहे. बोराखेडी शाळेला दान मिळालेल्या जागेत 5 जुन 2021 या जागतिक पर्यावरण दिनाला 10 फुट
उंचीचे 2 गुलमोहर वृक्षांचे वृक्षारोपण करून संपुर्ण परिसरात वृक्षारोपण करण्याचा संकल्प मुख्याध्यापक अनिल चव्हाण
यांनी केला आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |
पक्षीही सुस्वरे आळवीती ||
येणे सुखे रुचे एकांताचा वास |
नाही गुणदोष अंगी येत ||
आकाश मंडप पृथ्वी आसन |
रमे तेथे मन क्रीडा करी ||
कंथा कमंडलु देह उपचारा |
जाणवितो वारा अवसरु ||
हरिकथा भोजन परवडी विस्तार |
करुनी प्रकार सेवू रुचि ||
तुका म्हणे होय मनाशी संवाद |
आपुलाची वाद आपणासी ||
अशा सुंदर सहज व सोप्या भाषेत संत तुकाराम महाराज यांनी पर्यावरणाबाबत महत्त्वाचा संदेश जनतेला
दिला आहे . यावर्षी आपण निरोगी स्वच्छ पर्यावरण पुरक जीवन जगण्यासाठी प्रत्येकांनी एका झाडाचे वृक्षारोपण करावे
असे विनंती पुर्वक आव्हाहन अनिल चव्हाण यांनी केले आहे .सदर वृक्षारोपणासाठी सौ सुनिता हुडेकर सौ वामिंद्रा गजभिये
सौ अनिता धोरण यांची उपस्थिती होती..
0 Comments