जिल्हा परिषद बोराखेडी शाळेला आदर्श शाळेचा निवड बहुमान......मोताळा लगल असलेली ग्रामीण भागातील उपक्रमशील आंतरराष्ट्रीय जि प बोराखेडी शाळेला महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी 2012 पासुन शाळेचा चेहरामोहरा बदलून आज आदर्श शाळेचा किताब मिळवून दिला असुन बोराखेडी शाळेचा झालेला विकास बघुन मी मुख्याध्यापक या पदाला योग्य न्याय मिळवून दिल्याचा समाधानकारक मत व्यक्त केले आहे. ग्रामपंचायत तसेच गावकरी व परीसरातील मदतीने लोकसहभागातून बोराखेडी शाळेचा विकास साधला असुन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित विद्यार्थी हिताचे कार्य केले आहे. 2012 ला 253 पटसंख्या होती आज बोराखेडी शाळेत आज नर्सरी पासुन तर 8 वी पर्यंतचे 460 असे गरिबी वंचित घटकातील भरघोस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावाचे सहकार्य व शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती तळमळ बघता सदर शाळेने आदर्श शाळेपर्यंत बहुमुल्य अशी मजल मारली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शाळेच्या या नविन योजनेनुसार ग्रामीण भागातील शाळेचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. सदर शाळेत प्रशस्त कंम्पुटर लँब, ग्रंथालय, व्हर्च्युअल क्लासरू, आर ओ वाँटर , हँडवाँश, डिजिटल वर्गखोल्या, स्वच्छता गृह, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान व साहित्य अशा आवश्यक भौतिक सुविधांसाठीसह गुणवत्ता विकासासाठी शासनाने नियोजन केले आहे. खर तर आदर्श शाळेच्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील गरिब वंचित विद्यार्थ्यांना विनामुल्य दर्जेदार शिक्षण मिळणार असुन याचा फायदा बोराखेडी परिसरातील अनेक खेड्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे. मुख्याध्यापक अनिल चव्हाण म्हणतात की हे यश म्हणजे आजपर्यंत या शाळेसाठी दिलेल्या शाळा समिती सरपंच गावकरी परिसरातील प्रत्येक दानशूर व्यक्तीचे यश आहे.तसेच भविष्यात सुद्धा शाळा व विद्यार्थी विकासासाठी मदतीची विनंतीपर्वक अपेक्षा व्यक्त केली आहे. बोराखेडी शाळेची आदर्श शाळा निवडीबद्दल मोताळा गटशिक्षणाधिकारी सोनुने साहेब ,शाळा व्यवस्थापन समिती सभापती किशोर चहाकर, शिक्षक, सरपंच आशाताई तेलंग ,गावकरी ,पालक तसेच परिसरातील सर्व दानशुर व्यक्तींनी शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे.
0 Comments