घरच्या टाकाऊ वस्तूंपासून सोप्या पद्धतीने राखी तयार करण्याच्या कृती.....
कृती :-१... सुरवातीला एक गोल पुठ्ठा घ्या नंतर रंगिबेरंगी पेपर घ्या त्याला घडी घालून पुठ्ठ्यावर फेविकॉल ने चिटकवा, मधे रंगिबेरंगी मोतीमनी गोल लावा, पुठ्ठ्याच्या खालच्या बाजूला मनी टाकून लेस लावा राखी तयार
कृती :-२...परत सुरवातीला एक गोल पुठ्ठा घ्या त्यावर कान साफ करण्याचे बड्स घेऊन समोरचे टोक कलर करून कापून घ्या ते पुठ्ठ्याच्या वरच्या बाजूला फेविकॉल ने चिकटवा मधे रंगीबेरंगी मोती गोल आकारात चिकटवा खालच्या बाजूला लेस लावा राखी तयार
कृती:-३.. आईसक्रीम चे लाकडी चमचे घ्या त्याला रंगीबेरंगी रंगवून एका गोल पुठ्ठ्याच्या वरच्या बाजूला फेविकॉल ने चिटकवा मधे रंगीबेरंगी मनी गोलाकार लावा खालच्या बाजूला लेस लावा राखी तयार.
कृती:-४..एक गोल पुठ्ठा घ्या त्यावर माचिसच्या काड्या रंगीबेरंगी रंगांच्या चिटकवून मधे रंगीबेरंगी मनी लावा खालच्या बाजूला लेस लावा राखी तयार
कृती:-५.. एका गोल पुठ्ठ्याच्या वरच्या बाजूला फेविकॉल लावून त्यावर मसुर दाळ लावा मधे मनी लावा आजुबाजुला तांदुळ चिटकवून परत मनी लावा खालच्या बाजूला लेस लावा राखी तयार
कृती:-६.. परत एकदा गोल पुठ्ठा घ्या त्यावर कान साफ करण्याच्या बड्सचे समोरचे टोक कापून रंगवून लावा मधे मनी लावा आणि खालच्या बाजूला लेस लावा राखी तयार
कृती:-७.. एका गोल पुठ्ठ्याच्या वरच्या भागावर रंगिबेरंगी ग्लिटर पेपर गोल
करून फेविकॉल ने चिटकवा मधे मनी लावा खालच्या बाजूला लेस लावा
राखी तयार...
0 Comments