Subscribe Us

शिक्षक वाढदिवसाला विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.. बोराखेडी शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम



                                  


  बोराखेडी शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षक वाढदिवसाला विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..

                   कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमा अंतर्गत आदर्श जि प शाळा बोराखेडी येथील शिक्षिक शिक्षिका सातत्याने विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन गटागटाने वस्तीमध्ये जाऊन शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांप्रती आपुलकी व प्रेम यांचे आदर्श उदाहरण म्हणजे बोराखेडी येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या शैक्षणिक साहित्यातून दिसून येतो. बोराखेडी शाळेतील शिक्षिका सौ सुनिता हुडेकर यांचा वाढदिवस झाला सौ हुडेकर व सौ अनुप्रिता व्याळेकर मँडम ह्या वर्ग 1 ली ला अध्यापन करतात वर्ग 1 ली ला आदर्श शाळेचा नवीन पथदर्शी अभ्यासक्रम आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्यापन देण्यासाठी सौ हुडेकर व सौ व्याळेकर मँडम यांनी आपल्या वर्ग 1 ली च्या  विद्यार्थ्यांना सुंदर व वळणदार हस्ताक्षर लेखन सराव व्हावा यासाठी वर्गातील 57 विद्यार्थ्यांना स्वखर्चाने 100 रू प्रमाणे साधारण 5700 रु चांगल्या दर्जाच्या आखीव पाट्या वाटप केल्या. तसेच श्रीमती सुनीता न्हावकर मँडम यांनी स्वतःच्या वाढदिवसाला वर्ग 4 थी च्या 43 विद्यार्थ्यांना 3000 रु किंमतीच्या वह्या पेन वाटप करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली. सौ वामिंद्रा गजभिये मँडम यांनी स्वतःच्या वाढदिवसाला वर्ग 5 वी  च्या 53 विद्यार्थ्यांना साधारण 8000 रू किंमती चे शुज व साँक्स वाटप करून शैक्षणिक मदत केली. 
                उपक्रमशिल आदर्श जि प शाळा बोराखेडी येथील मुख्याध्यापक अनिल चव्हाण व शिक्षक  कोरोना काळात विद्यार्थ्यांना सातत्याने आंँनलाईन व आँफलाईन घरोघरी जाऊन शैक्षणिक अध्यापण कार्य तर करत आहेच त्यासोबतच गरिब वंचित घटकातील विद्यार्थ्यांची कोरोना परिस्थितीची भान ठेवून विद्यार्थ्यांना आवश्यक लागणारे शैक्षणिक साहित्याचे वाटप करून एक आगळावेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण होऊन शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मदत होणार आहे.

                          खर तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व शालेय साहित्य वाटप करण्याची हि योग्य वेळ आहे. कारण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थिती नुसार शालेय साहित्य विकत घेणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत शिक्षकांनी जर आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शालेय शैक्षणिक साहित्य वाटप केले तर शिक्षक व शाळा याविषयी आपुलकी निर्माण होऊन माणुसकीचे दर्शन घडणार आहे. आपण जर ठरवले तर थोडीफार मदत करून आपल्या शाळेतील विकास आपल्या शिक्षकांच्या योगदानाने निश्चितपणे करू शकतो. बोराखेडी जि प शाळेतील या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आदर्श ईतर शाळेला प्रोत्साहित करून प्रेरणादायी ठरेल हे निश्चित....

                                  
                                                                                                                                                                                                                                       







Post a Comment

0 Comments