Subscribe Us

3% टक्के महागाई भत्ता बाबत अखेर राज्य सरकारकडून हिरवे कंदील दिले आहे.

 


3% टक्के महागाई भत्ता बाबत अखेर 

राज्य सरकारकडून हिरवे कंदील .


 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा मागील तीन महिन्यापासून 

रखडलेला वाढीव 3% टक्के महागाई भत्ता बाबत अखेर 

राज्य सरकारकडून हिरवे कंदील दिले आहे.

कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे कर्मचार्‍यांचा 

महागाई भत्ता मधील वाढ लांबणीवर जाण्याची शक्यता

सर्वांना वाटत होती. परंतु राज्य सरकार माहे जानेवारीच्या 

वेतन देयकासोबत राज्य कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता 

रोखीने दिला जाणार आहे.याबाबत वित्त विभागासोबत 

चर्चा झाली आहे . हा वाढीव 3% महागाई भत्ता केंद्र

सरकार प्रमाणे 1 जुलै 2021 पासूनच लागू केला जाणार

आहे .तसेच 01 जुलै 2021 पासून ते माहे डिसेंबर 2021

पर्यंत 3% महागाई भत्ता फरक सुद्धा दिला जाणार आहे.

हा वाढीव महागाई भत्ता सेवानिवृत्त पेंशन धारक त्याचबरोबर

कुटुंबनिवृत्ती वेतन धारक कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू होणार आहे.


राज्य शासकीय कर्मचारी मध्ये महागाई भत्ता साठी मोठा

असंतोष वाढत असल्याने राज्य सरकारकडून याबाबत निर्णय 

घेणे उचित ठरेल ,जर राज्य कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केल्यास

कोरोना महामारीचा संसर्ग जास्त वाढण्याची शक्यता असल्याने 

राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्यास विरोध 

केला आहे .परंतु महागाई भत्ता वाढ करण्या बाबत राज्य

शासन सकारात्मक बाजूने आहे .

Post a Comment

0 Comments