उत्तरांची गंमत, प्रश्नोत्तरात यमक जुळवणारे
उत्तर 'र'अक्षरांची गंमत
१) पाण्यात राहणारे प्राणी -- जलचर
२)लिहिता , वाचता येणारा-- साक्षर
३)लिहिता - वाचता न येणारा - निरक्षर
४)बातमी आणून देणारा -- वार्ताहर
४)वनात राहणारे प्राणी -- वनचर
५)जमिनीवर राहणारे -- भूचर
६)धान्य साठवण्याची जागा -- कोठार
७)जमिनीखालून गेलेला रस्ता -- भुयार
८)कथा(गोष्ट) लिहिणारा -- कथाकार
९)दगडावर मूर्ती घडवणारा - शिल्पकार
१०)जादूचे खेळ करून दाखवणारा -- जादूगार
११)नाटक लिहिणारा -- नाटककार
१२)चित्रे काढणारा -- चित्रकार
१३)खूप दानधर्म करणारा -- दानशूर
१४)शत्रूला सामील झालेला -- फितूर
१५)शत्रूकडील बातम्या काढणारा -- हेर
१६)भारताचा राष्ट्रीय पक्षी -- मोर
१७ )एक पाळीव प्राणी -- मांजर
१८)पाण्यातील एक प्राणी -- मगर
१९)झाडावर सरसर चढणारा प्राणी -- खार
२०)सरपटणारा एक प्राणी -- अजगर
२१)मसाल्याचा एक पदार्थ -- केशर
२२) मोराची मादी -- लांडोर
२३)मीठ तयार करतात ते ठिकाण - मिठागर
२४)लोखंडी वस्तू तयार करणारा - लोहार
२५)सोन्या -चांदीचे दागिने बनवणारा - सोनार
२६)मातीची मडकी बनवणारा -- कुंभार
२७)आजारी लोकांना औषधे देणारा - डाॅक्टर
२८)लाकडी वस्तू तयार करणारा -- सुतार
२९)चामड्याच्या चपला बनवणारा - चांभार
३०)केळ्यांचा (घड) समूह -- लोंगर
३१)महाराष्ट्राची उपराजधानी - नागपूर
३२)एक कडधान्य -- मसूर
३३)एक बी असणारे एक फळ -- बोर
३४)एक शेंग भाजी -- गवार
३५)या वनस्पतीपासून कात काढतात - खैर
३६)हातमागावर कापड विणणारा -- विणकर
३७)एक गोड पदार्थ -- साखर
३८)खा-या पाण्याचा मोठा साठा -- महासागर
३९)लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक - मीटर
४०)पाण्याचा एक स्त्रोत -- विहीर
===================
0 Comments