Subscribe Us

विद्यर्थी व शाळा बाबत दिलासादायक वृत्त

           



विद्यर्थी व शाळा बाबत दिलासादायक वृत्त 

 राज्यातल्या शाळांबाबत बुधवारच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार 

असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीये. ते 

जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. जिथे कोरोनाचे रुग्ण नाहीत

 त्याठिकाणी शाळा सुरु कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली

 आहे. याच विषयावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही शाळा सुरु 

करण्याची विनंती केली आहे. त्यावर बोलताना सुप्रियाताईंच्या 

मागणीचा विचार करु, असंही ते म्हणाले.

शाळा सुरु करण्याबाबत येत्या बुधवारच्या कॅबिनेटमध्ये चर्चा

होणार असून स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याचा विचार

आहे, असं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं. तसंच अनेक

पालकही शाळा सुरु करण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे जिथे 

कोरोनाच्या कमी केसेस आहेत, तिथे प्रामुख्याने शाळा सुरु 

करण्याचा निर्णय होणार असल्याचे संकेत मंत्री टोपे यांनी दिले.

                राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून 

कोरोना आणि ओमायक्रॉनची संख्या वाढते आहे. त्या 

पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय

राज्य सरकारने घेतला. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना 

रुग्णसंख्या नगण्य असताना शाळा बंद करणे, विद्यार्थ्यांचं 

अगोदरच मोठं शैक्षणिक नुकसान झालेलं असताना शाळेला 

टाळं लावणं योग्य नसल्याचं मत अनेक पालक व्यक्त करत

आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याची 

तयारी दाखवली आहे 

Post a Comment

0 Comments