शिक्षकांच्या बदल्या होणार मोबाईल अँपद्वारे
कोरोनामुळे दोन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेतील
शिक्षकांच्या बदल्या थांबल्या आहेत.परंतू २०२२ मधे
अधिकारी व शिक्षक संघटना यांच्या अभ्यास गटात
बदल्या करण्यासाठी एकमत झाले आहे.
बदल्या कशा व्हायला हव्यात यात काय सुधारणा
व्हावी यासाठी पुण्याचे सिईओ आयुष प्रसाद यांच्या
नेतृत्वाखाली अभ्यास गट नेमला होता व राज्यातील
विविध संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करून सर्व संघटनांनी
आंँनलाईन पध्दतीने बदल्या बाबत शिफारस केली आहे.
विशेष म्हणजे बदल्या पारदर्शक व्हायला
हव्यात यासाठी यावर्षी बदल्या ह्या मोबाईल अँपवरून
होणार असुन घरच्याघरी स्वतःचा बदली अर्ज करता येणार
आहे. लवकरच बदल्यांचे मोबाईल अँप विकसित होणार आहे.
रिक्त शाळांची यादी सर्वाना मोबाईल वर मिळणार आहे
अनेक सुविधा यात सहज वापरता येतील याबाबत साँप्टवेअरचे
काम अंतिम टप्प्यात आहे. मागील आठवड्यात झालेल्या
आँनलाईन मिटींगमधे ३१ मे पुर्वी बदल्या १००% होणार असे
मत ठरले आहे.बदल्यांचे निकष व निर्णय याअगोदर शासनाने
निर्गमित केलेल्या निर्णयानुसार होतील अशी विशेष
सूत्राकडून माहिती......
0 Comments