स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान सरावासाठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द
अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होतो.
अशा अनेक समूहांची यादी खाली दिली आहे .
कोणाचाही आधार नाही असा = अनाथ
ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे = अनमोल
मागाहून जन्मलेला (धाकटा भाऊ) = अनुज
पूर्वी कधीही न घडलेले = अभूतपूर्व
जे टाळले जाऊ शकत नाही असे = अपरिहार्य
एखाद्या गोष्टीची उणीव असणारी स्थिती = अभाव
ज्याला कधीही मृत्यू नाही असा = अमर
ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे = अनुपम, अनुपमेय
ज्याचा कधीही वीट येत नाही असे = अवीट
मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण = अन्नछत्र
एकाच वेळी अनेक अवधाने राखून काम करणारा = अष्टावधानी
पायांत पादत्राणे न घालता = अनवाणी
पूर्वी कधीही न ऐकलेले = अश्रुतपूर्व
पूर्वी कधीही न पाहिलेले = अदृष्टपूर्व
कोणाच्याही पक्षात सामील न होणारा = अपक्ष
थोडक्यात समाधान मानणारा = अल्पसंतुष्ट
कमी आयुष्य असलेला = अल्पायुषी, अल्पायू
एकाला उद्देशून दुसऱ्यास बोलणे = अन्योक्ती
मोजता येणार नाही इतके = असंख्य, अगणित
अग्नीची पूजा करणारा = अग्निपूजक
ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा = अद्वितीय, अजोड
ज्याला एकही शत्रू नाही असा = अजातशत्रू
विविध बाबींत प्रवीण असलेला = अष्टपैलू
ज्याने लग्न केले नाही असा = अविवाहित (ब्रह्मचारी)
ज्याचा थांग (खोली) लागत नाही असे = अथांग
घरी पाहुणा म्हणून आलेला = अतिथी
अनुभव नसलेला = अननुभवी
अन्न देणारा = अन्नदाता
आवरता येणार नाही असे = अनावर
विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य = अतिक्रमण
आकाशातील ताऱ्यांचा पट्टा = आकाशगंगा
जिवंत असेपर्यंत = आजन्म
थोरांनी लहानांच्या प्रती व्यक्त केलेली सदिच्छा = आशीर्वाद
0 Comments