Subscribe Us

बदली अपडेट यावर्षी ३१ मे पर्यंत १००% बदल्या होणार

 


बदली अपडेट  यावर्षी ३१ मे पर्यंत १००% बदल्या होणार

  "३१ मे पर्यंत संच मान्यता व समायोजन प्रक्रिया राबवा" या शिक्षण संचालकांच्या पत्रामुळे या वर्षी पुन्हा बदल्या रखडणार का? तसेच नवीन शुद्धीपत्रक आता निघणार की नाही या संभ्रम अवस्था राज्यातील सर्व शिक्षकांची झाली होती .

    यासाठी पुन्हा मा.ना. हसन मुश्रीफ साहेब यांच्या सूचनेवरुन मा. आयुष प्रसाद साहेब यांची संघटना पदाधिकारी यांनी पूणे जिल्हापरिषद येथे भेट घेऊन सविस्तर बदली संदर्भात चर्चा केली. ते ठळक मुद्दे......

👉 यावर्षी ३१ मे पर्यंत १००% बदल्या होणार यात तिळमात्र शंका नाही असे मा. प्रसाद साहेबांनी स्पष्ट केले.

👉 संच मान्यते बाबत मा. शिक्षण आयुक्तांशी दोन दिवसांत चर्चा करुन संच मान्यता लवकर करुन घेणार असल्याचे सांगितले.

👉 सर्व शिक्षकांची अद्यावत माहिती सॉफ्टवेअर वर अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

👉 बदली प्रक्रिया मध्ये सर्व शिक्षकांची भरलेली माहिती इतरांना पण दिसणार. त्यामूळे संवर्ग १/२ मध्ये चुकीची माहिती भरलेस सर्वांना दिसणार आहे . खोटी माहिती भरण्यासाठी आळा बसेल . खोटी माहिती भरले बाबतची तक्रार  प्राप्त झालयास  शिक्षणाधिकारी त्या शिक्षकाची खरी माहिती अपलोड करणार . ती सर्वांना दिसणार.

👉 शिक्षकांनी स्वत:चे मोबाईल नंबर अपडेट करुन घ्यावेत. दोघामध्ये( पती / पत्नी मध्ये) एकच नंबर असू नये.

👉 बदलीसाठी अँप तयार केले असून त्यावर बदली प्रक्रियेची सर्व माहिती उपलब्ध असणार आहे.

👉 बदली अँप उघडताना आपणांस OTP क्रमांक मोबाईल वर येणार. तो टाकल्यानंतरच आपला बदली अर्ज व इतर माहिती उपलब्ध होणार आहे. तेंव्हा प्रत्येकाचा अपडेट वैयक्तीक मोबाईल नंबर पाहिजे.

👉 बदल्याचे शुद्धीपत्रक काढणार नाही, पण खाली

ल बाबी सॉफ्टवेअर मध्ये दुरुस्त १००% करणार असल्याचे सांगितले. परंतू शिष्टमंडळाने शुद्धीपत्रकाचा अट्टाहास धरल्यानंतर मा. मंत्रीमहोदयांशी चर्चा केलेनंतर शुध्दीपत्रक काढू असे अभिवचन दिले.

👉 बदलीसाठी ३० जून ही तारीख धरणार

👉 संवर्ग ४ साठी विनंती बदलीसाठी ३ वर्षे सेवेची अट राहिल. सदरच्या बदल्या ५ व्या टप्प्यात रिक्त जागेवर होतील.तसेच प्रशासकीय आणि विनंती बदल्या सारख्याच टक्केवारीत होतील.

👉२०१७ च्या बदली जी. आर. मधील दुर्गम शाळा यावर्षीही बदलीसाठी धरणार असून त्यामध्ये नवीन बदली जी. आर. नुसार नवीन शाळा समाविष्ट होतील.

👉 गेल्या बदलीमध्ये ४ थ्या व ५ व्या टप्प्यात विस्थापित, रँडम मध्ये गैरसोयीत गेलेले व अनफीट फॉर लेडीज भागात गेलेल्या महिलांना या बदलीत संवर्गनुसार बदली फॉर्म भरणेस सेवेची अट न ठेवता मुभा असणार आहे.

👉 आंतर जिल्हा बदली मध्ये १०% पेक्षा जास्त रिक्त असणाऱ्या जिल्ह्यामध्ये अपंगाना संधी देण्याचा प्रयत्न राहिल.

  वरील बाबीचे शुद्धीपत्रक मा.ना. हसन मुश्रीफ साहेब यांच्याशी चर्चा करुन काढणार असल्याचे मा. प्रसाद साहेबांनी शिष्टमंडळाला सांगितले .

Post a Comment

0 Comments