Subscribe Us

म्हणी व त्यांचे अर्थ जाणून सविस्तर जाऊन घेऊया

 


म्हणी व त्यांचे अर्थ जाणून सविस्तर जाऊन घेऊया  

 1अगं अगं म्हशी मला कोठे नेशी

स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.

2. पी हळद हो गोरी 

उतावळेपणा दाखविणे

3. आपला हात जगन्नाथ

आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.

4. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही

प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

5. अति तेथे माती

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.

6. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर

दोनपैकी एक पर्याय निवडणे

7. आयत्या बिळात नागोबा

दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.

8. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे

प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

9. उंटावरचा शहाणा

मूर्ख सल्ला देणारा

10. आईजीच्या जीवावर बाईजी उदार

दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.

11. नाचता येईना अंगण वाकडे 

स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो

12. आपल्याच पोळीवर तूप ओढणे

फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.

13. छत्तीसाचा आकडा

विरुद्ध मत असणे

14. आंधळे दळते कुत्रं पीठ खाते

एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा.

15. तेरड्याचा रंग तीन दिवस

एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे

16. आधी पोटोबा मग विठ्ठोबा

आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.

17. अडला हरी गाढवाचे पाय धरी

एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.

18. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे

अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.

19. अति शहाणा त्याचा बैल रिकामा

जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.

20. आधी शिदोरी मग जेजूरी

आधी भोजन मग देवपूजा

21. दुष्काळात तेरावा महिना

संकटात अधिक भर

22. असतील शिते तर जमतील भुते

एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.

23. नव्याचे नऊ दिवस 

नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही

24. आचार भ्रष्टी सदा कष्टी

ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.

25. वासरात लंगडी गाय शहाणी 

अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा


Post a Comment

0 Comments