व्याकरणात्मक मराठी मुळाक्षर व अक्षरांची गंमत ओळखुया
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
क, ख, ग, घ, ङ - यांना कंठव्य म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.
च, छ, ज, झ,ञ- यांना तालव्य म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळूला लागते.
एकदा करून बघा
ट, ठ, ड, ढ , ण- यांना मूर्धन्य म्हणतात.कारण यांचा उच्चार जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा.
त, थ, द, ध, न- यांना दंतव्य म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.
प, फ, ब, भ, म,- यांना ओष्ठ्य म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो. एकदा म्हणून बघा .
0 Comments