Subscribe Us

आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे कला कार्यानुभव कागद कामाचे प्रात्यक्षिक करतांना शिक्षक....

 


                           



आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे कला कार्यानुभव कागद कामाचे प्रात्यक्षिक करतांना शिक्षक....

         आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. कोविड काळातील सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसण्याची सवय व एकाग्रता वाढवण्यासाठी  आज मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी कला कार्यानुभव या विषयावर वेगवेगळ्या कागदापासून फुल पाने पक्षी मोर असे वेगवेगळे साहीत्य  बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच वर्ग 7 वि च्या वर्ग शिक्षिका जया चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फुल बनविण्याची कृती करून दाखविली तसेच कला कार्यानुभव विषय हा विद्यार्थ्यांना आवडणारा विषय आहे त्यांच्या तासिका नियमित घेणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची गोडी लागते व उपस्थिती वाढण्यास मदत होते तसेच विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित होते. तसेच या विषयामुळे इतर विषयात आवड निर्माण होऊन अभ्यासक्रम पूर्ण होतो.कार्यानुभव हा विषय कला कुसर दाखवणे व साहित्य निर्मिती करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवडते. यामुळे विद्यार्थी गटा गटात बसतात सांघिक भावना निर्माण होते तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला व सुप्त गुणांना वाव मिळते आणि शालेय उपस्थिती टिकविण्यासाठी मदत होते .असेच वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून शालेय विद्यार्थी विकास साधण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक नियमितपणे करीत असतात.

Post a Comment

0 Comments