राज्यातील सर्वच जिल्हा परिषद व खाजगी शाळांमधे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची घोषणा
मुंबई:- येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय शाळांमधे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. राज्यातील शासकीय शाळेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असुन त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय शाळेत वर्षभरात टप्पा टप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वर्षां गायकवाड यांनी म्हटले आहे.
ज्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे अशा शाळांमध्ये प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वर्षां गायकवाड यांनी म्हटले आहे. राज्यात एकूण 65 हजार जिल्हा परिषद शाळा आहेत. त्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे लावून चालणार नाही तर त्याची व्यवस्थित देखभाल होण्याची गरज असल्याचे वर्षां गायकवाड यांनी म्हटले आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या:-
राज्य सहकारचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. राज्यातील 65 हजार शाळेची संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता तेथील विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी शासनाची आहे.येत्या वर्षभरात मोठ्या शाळेंना प्राधान्य देऊन जिल्हा परिषद व खाजगी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
*विद्यार्थी सुरक्षेत वाढ करण्याची महत्त्वाची घोषणा करून शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्यात येणार असून शाळेतील वाईट प्रसंग टळणार आहे व गैर प्रकारांना आळा बसणार आहे असे प्रतिपादन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
0 Comments