Subscribe Us

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आदर्श बोराखेडी शाळेत वृक्षारोपण.


 




जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आदर्श बोराखेडी शाळेत वृक्षारोपण. -----

                       मोताळा तालुक्यातील उपक्रमशील आदर्श जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी येथील मुख्याध्यापक अनिल चव्हाण वर्षेभर शैक्षणिक व सहशालेय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. विशेष दिन, जयंती, उत्सव , वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय परिसरात वृक्षारोपण करणे हा या शाळेतील एक नाविन्यपूर्ण उपक्रम मुख्याध्यापक सतत १० वर्षापासुन राबवित आहे यामुळे येथील शाळा जणू वनराईने नटलेली असल्यासारखी दिसून येत आहे. आणि सदर परिसर सुशोभित निसर्गरम्य व शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना मनमोहक वाटतो. आज ५ जून २०२३ पर्यावरण दिवस यानिमित्ताने शाळेत ५ निंब या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. निंब या वृक्षापासुन जास्त आँक्सिजन व सावली मिळते तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पती असुन  हे देशी वृक्ष आहे‌. विशेष म्हणजे दरवर्षी शाळेतील परिसरात ६ ते ८ फुट उंचीचे वृक्षारोपण करण्यात येते याचे कारण मोठ्या वृक्षाचे संगोपन करणे सोईचे असुन मोठ्या वृक्षाची वाढ लवकर होऊन पर्यावरण संतुलित करण्यासाठी खुप फायदा होतो. मागिल पर्यावरण दिनानिमित्त ८ फुट उंचीचे वृक्षारोपण केलेल्या वृक्षाचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी चांगल्या प्रकारे संवर्धन करुन आज गुलमोहर हे वृक्ष सावली देत आहेत हे मोठ्या वृक्षारोपणाचे खास वैशिष्ट्ये आहेत. 
                             सन २०२३ मधे तापमानाच्या झळा प्रत्येक नागरिकाला अनेक वर्षे लक्षात राहतील ,पर्यावरणात प्रदुषण वाढत चालले आहे त्यामुळे तापमानात सतत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत पृथ्वी वरील पर्यावरण संतुलित करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. दवाखान्यात लाखो रुपये देऊन आँक्सिजन घेतो व आपण डॉक्टरांना देव मानतो पण निसर्ग आपल्याला मोफत आँक्सिजन देतो खरा देव निसर्ग आहे आपण निसर्गाला जपलं पाहिजे त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे विनंतीपुर्ण आवाहन आज पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी  केले आहे. यावेळी वृक्षारोपण करण्यासाठी शाळेतील शिक्षीका सौ अनुप्रिता व्याळेकर सौ सुनिता हुडेकर सौ सिमा गोरे व अंगणवाडी सेविका अनिता धोरण उपस्थित होत्या.


Post a Comment

0 Comments