Subscribe Us

गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते आदर्श जि प शाळा बोराखेडी येथील नवोदय पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार.

 


गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते आदर्श जि प शाळा बोराखेडी येथील नवोदय पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार.

      मोताळा लगत आदर्श जिल्हा परिषद बोराखेडी शाळेत विद्यार्थी गुणवत्तेसाठी शैक्षणिक उपक्रम राबविणारी उपक्रमशिल शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. सन 2021-22 या मागिल शैक्षणिक वर्षात कोरोना प्रादुर्भाव वाढलेला असल्याने संपूर्ण शाळा बंद असतांना सुध्दा मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे जुलै -21 ते एप्रिल -22 पर्यंत कोरोना नियमांचे पालन करत नियमित शाळा सुरू करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले.तसेच पालक व विद्यार्थ्यांनी सुद्धा या शैक्षणिक कार्यात उस्फुर्त प्रतिसाद दिला.

                 कोरोना काळात शाळा पुर्ण सत्रात सुरू असल्यामुळे नवोदय परिक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा,एन एम एम एस परिक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करून घेतली. याचेच फलित म्हणजे जिल्ह्यातिल हजारो विद्यार्थ्यांमधुन फक्त 80 पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांची अत्यंत काठिण्य पातळी असलेल्या नवोदय परिक्षेत बोराखेडी येथील गरिब कुटुंबातील देवेंद्र विनोद पुरभे हा विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र झाला आहे. आदर्श जि प शाळा बोराखेडी येथील विद्यार्थी नवोदय प्रवेश पात्र झाल्याने शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधे आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असुन बोराखेडी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मोताळा गटशिक्षणाधिकारी श्री मोरे व विस्तार अधिकारी देविदास प्राणकर केंद्र प्रमुख नरवाडे सर व मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी नवोदय प्रवेश पात्र झालेल्या देवेंद्र पुरभे यांचा पुष्पगुच्छ व स्कूल बँग, ड्रेस देऊन सत्कार केला. तसेच वर्ग शिक्षिका सौ वामिंद्रा गजभिये यांचा सत्कार करून इतर शिक्षकांचे कौतुक करत प्रोत्साहन दिले. यावेळी शाळेतील  शिक्षक सौ अनुप्रिता व्याळेकर सौ सुनिता हुडेकर सौ सिमा गोरे सुनिता न्हावकर संध्या नाईक जया चव्हाण व पावरा सर उपस्थित होते.

१]सेतू चाचणी गुणदान तक्ता 👉डाउनलोड करा

२]उपयोगिता प्रमाणपत्र 👉डाउनलोड करा

३] सेतू चाचणी गुणदान तक्ता १ ते ५ 👉डाउनलोड करा

४] शा पो आ मेनू टेबल 👉डाउनलोड करा

५] स्पर्धा परिक्षा सामान्य ज्ञान 👉डाउनलोड करा


Post a Comment

0 Comments