Subscribe Us

*इम्यूनिटी वाढवण्यासाठी घरगुती काढा

 


*इम्यूनिटी वाढवण्यासाठी घरगुती काढा*

{Saritadhore}

*साहित्य*::-

10 ग्रॅम लवंग 

10 ग्रॅम हिरवी वेलची 

10 ग्रॅम काळी मिरी 

10 ग्रॅम कल्मी 

10 ग्रॅम तेजपान 

10 ग्रॅम हळद किंवा ओले हळकुंड 

10 ग्रॅम सुंठ किंवा अदरक 

तुळशीची पाने 

 चवीनुसार गुळ किंवा काळं मीठ 

वरील सर्व साहित्य मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे, ((फक्त त्यात अदरक आणि ओले हळकुंड,गुळ किंवा मीठ घालु नये)) 

*कृती*::-$


प्रमाण चार लोकांसाठी-:-

प्रथम एका भांड्यात दोन ग्लास भरून पाणी घ्यावे व गॅस वर गरम करत ठेवावे, त्यात वरील तयार केलेलं पावडर एक चमचा भरून घालावे,व एक इंच अदरक चा तुकडा किसुन घालावे, 8 ते 10 तुळशीची पाने, घालावे,पावडर मध्ये हळद घातली नसेल तर अर्धा चमचा हळद घालावी, नंतर दोन चमचे गुळ घालावे, तुम्हाला गुळ नको असेल तर अर्धा चमचा काळं मीठ घालून छान 10 ते 15 मिनिटे मिडियम गॅस वर शिजवून घ्यावेत,नंतर गॅस बंद करावा व 2 मिनिट झाकून ठेवावे म्हणजे मसाला चे सगळे फ्लेवर काढ्यात उतरतात..नंतर चार कप मध्ये गाळून गरम असतानाच चहा सारखे प्यायला घ्यावे...😊


Post a Comment

0 Comments