क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2021-22 अटी व शर्ती
प्रस्तावासाठी आवश्यक अटी:
1) शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक.
2) मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी/प्रशासनअधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक.
3) शिक्षक/मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान 10 वर्षे आवश्यक
4) शिक्षकाचे/मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल.
5) पोलिस खात्याचा चारित्र्य पडताळणी दाखला.
6) विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.
7) शिक्षकांनी केलेल्या लगतच्या 5 वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाव्दारे करण्यात येईल.
8) प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत.
9) शिक्षकाच्या सेवेतील कार्यपध्दतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
10) शिक्षकांची मूळ नियुक्ती आदेश व खाजगी शाळांचे बाबतीत वैयक्तिक मान्यता आदेश सादर करणे आवश्यक आहे
*आपणास प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक, आदिवाशी क्षेत्रात काम करणारे शिक्षक- प्राथमिक , थोर समाजसेवक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, विशेष कला क्रीडा , दिव्यांग शिक्षक-दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक, आणि स्काउट गाईड पुरस्कार एव्हड्या पुरस्कार प्रकारांपैकी केवळ एकाच पुरस्कारासाठी नोंदणी करावी लागते व त्यानुसार सर्व पुरावे आपल्याकडे असावेत*
शिक्षकांनी आपली माहिती गुगल फॉर्म Official Link लिंक मध्ये भरून त्याची प्रिंट तसेच दिलेल्या तपासणी सूचीनुसार प्रस्ताव दोन प्रतीत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचेकडे दिनांक. २८ जुलै, २०२२ पासून दिनांक.०७ ऑगस्ट,२०२२ पर्यंतच्या मुदतीतच दाखल करावा
0 Comments