Subscribe Us

CMP प्रणालीने वेतन करण्यापूर्वी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावयाची काळजी.

 




CMP प्रणालीने वेतन करण्यापूर्वी शिक्षक व मुख्याध्यापक यांनी घ्यावयाची काळजी.


               शिक्षक यांनी कोणती काळजी घ्यावी 


*👉 प्रत्येक शिक्षकांनी आपला वेतनाचा Account Number & IFSC code शालार्थ प्रणाली मधील Bank statement या पानावरून तपासून घ्यावे. यामध्ये दुरुस्ती असेल तर मुख्याध्यापक लॉगीन मधील update bank details या Tab चा उपयोग करून दुरुस्त करून घ्यावा.*


*👉 प्रत्येक शिक्षकांनी आपला वेतनाचे खातेची KYC update आहे किंवा नाही याची खात्री बँक मध्ये करावी. KYC Update नसेल तर Transaction होत नाहीत*


*👉CMP ने वेतन करणे संदर्भात संमती पत्रभरून मुख्याध्यापकांना देणे.*


          मुख्याध्यापक यांनी कोणती काळजी घ्यावी 


*💢 अधिनस्त प्रत्येक शिक्षक यांचे वेतनाचे खात्याची प्रत्यक्ष पासबुक / Bank statement या वरून पडताळणी करावी.*


* 💢 मुख्याध्यापकांनी ‌ शिक्षकांनी शालार्थ प्रणाली मधील Bank details या पेजवर दिलेल्या दुरुस्त्या तात्काळ करून दुरुस्ती केलेल्या bank statement या पेजवर स्वाक्षरी घेणे.*


* 💢अधिनस्त सर्व शिक्षकांचे वेतनाचे account number & IFSC code ची पडताळणी केल्याचे प्रमाणपत्र पंचायत समितीस सादर करणे.*


* 💢प्रत्येक शिक्षकाचे दरमहा जिल्हा स्तरावरून येणाऱ्या सुचनेनुसार वेतन देयक तयार करणे तसेच सर्व लागू असलेल्या गैरशासकीय कपाती ( co-op bank , credit society , Income tax , LIC , other deduction , other recovery ) नियमित करणे.*


*💢दरमहा देयकाचे change statement , outer ,inner , aquittance , bank statement याचे प्रिंट काढून त्यासोबत नियमित वेतन देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र जोडावे.*


*➡️अचूक खाते क्रमांक व IFSC code हा CMP प्रणालीने अचूक वेतन होण्याचा आत्मा आहे. ही बाब लक्षात घेऊन काम करावे*


Post a Comment

0 Comments