Subscribe Us

राज्य कर्मचारी यांच्या वाहन भत्ता मधे झाली मोठी वाढ...

 

राज्य कर्मचारी यांच्या वाहन भत्ता मधे झाली मोठी वाढ...

 राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीबाबत राज्य शासनाकडुन दि.17.08.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे . याच धर्तीवर सातवा वेतन आयोगानुसार मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता वाढ करण्याची बाब विचाराधीन होती .

मुंबई महानगरपालिकामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2019 पासुन सातवा वेतन आयोग लागु करण्यात आलेला आहे .

राज्य शासनाने नुकतेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतुक भत्तामध्ये वाढ करणेबाबत मोठा निर्णय घेतला आहे .याच धर्तीवर BMC कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ता लागु करण्यात येणार आहे .वेतनाच्या पे लेवल नुसार वाहतुक भत्ता वाढ लागु करण्यात येणार आहे .यामध्ये पे लेवल 01 ते 06 मध्ये वेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुक भत्ता 1000/- लागु करण्यात येणार आहे . तर लेवल 07 ते 19 मध्ये वेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2700/- रुपये वाहतुक भत्ता लागु करण्यात येणार आहे .त्याचबरोबर पे – लेवल 20 व त्यावरील लेवल मध्ये वेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5400/- रुपये वाहतुक भत्ता लागु करण्यात येणार आहे .

मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यरत सातवा वेतन आयोगानुसार वेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाहतुक भत्ता लागु करण्यात आला आहे .यामुळे BMC मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे .

राज्य कर्मचारी यांच्या वाहन भत्ता मधे झाली मोठी वाढ...

Post a Comment

0 Comments