जिल्हा अंतर्गत बदल्या देखील होणारच - ग्राम विकास मंत्री मा.गिरीश महाजन
जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया देखील शिक्षकांना ऑनलाईन प्रणाली द्वारे होणार.
आंतर जिल्हा बदली पोर्टल द्वारे पुर्णपणे पार पडली असुन आता जिल्हा अंतर्गत बदल्या करण्याचे संकेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.
तसेच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल विन्सेस कंपनीतर्फ प्रसिध्द व्हिडिओ करण्यात आला आहे. लवकरच बदली टप्पा क्रमांक 3 जिल्हा अंतर्गत सुरू होणार असल्याबद्दल माहिती दिली आहे.
💢सदर व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राच्या विधान भवनात अधिवेशनादरम्यान जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदली संदर्भात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आले या प्रश्नांना उत्तर देताना महाराष्ट्राचे ग्रामविकास जे मंत्री माननीय श्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले.
जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी पोर्टल सज्ज असुन जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा जिल्हा अंतर्गत बदलांसाठी दिनांक सात एप्रिल 2021 च्या दोन स्वतंत्र शासन निर्णय सुधारित धोरणाने करण्यात आले आहे शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया दिनांक एक ते 31 मे पर्यंत पूर्ण करण्याबाबत सदर शासन निर्णय मध्ये सुचित केले आहेत.
काही तांत्रिक अडचणीमुळे जिल्हा अंतर्गत बदली ऑनलाईन पोर्टल द्वारे बदली प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करणे शक्य झाली नाही सद्यस्थितीत जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी शिक्षकांनी अर्ज सादर करण्याची कार्यवाही पूर्ण झाली असून जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी शिक्षकांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज सादर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.
अलघड क्षेत्रात तिन वर्षे सेवा देणाऱ्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी जिल्हा अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय आवश्यक आहे
असे उत्तर माननीय ग्राम विकास मंत्री यांनी दिलेले असल्यामुळे आंतर जिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे आता जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्यास कोणतीच अडचण उरली नाही व आजच्या ग्रामविकास मंत्र्यांनी विधान भवनात दिलेल्या उत्तरानुसार जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया देखील सुरू करून ती यशस्वी होणारच अशी 100% खात्री वाटते.
💢शालेय सांस्कृतिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments