Subscribe Us

स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती साठी उपयुक्त म्हणी व अर्थ भाग 4

 




 स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती साठी उपयुक्त म्हणी व अर्थ भाग 4


💥एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत - दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत. 

 

💥ओळखीचा चोर जीवे न सोडी - ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.

 

💥कर नाही त्याला डर कशाला - ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे 

 

💥कामापुरता मामा ताकापुरती आजी - आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे. 

 

💥काळ आला होता. पण वेळ आली नव्हती - नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. 

 

💥कानामगून आली आणि तिखट झाली - मागून येऊन वरचढ होणे. 

 

💥करावे तसे भरावे - जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.

 

💥कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी - कधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे.

 

💥कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ - आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो. 

 

💥काठी मारल्याने पानी दुभंगत नाही- रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही. 

 

💥कडू कारले तुपात तळले सारखरेत घोळले तरीही कडू ते कडूच - किती ही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव (दूर्वर्तणी) बदलत नाही. 

 

💥कुडी तशी पुडी - देहाप्रमाणे आहार असतो. 

 

💥कधी तुपाशी तर कधी उपाशी - संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते

 ‌💢स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती बाबत  सामान्य ज्ञान प्रश्नावली क्लिक करा

💢शोध व संशोधक माहिती येथे क्लिक करा

💢सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे बघा

💥आदर्श परिपाठ नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments