Subscribe Us

शिक्षकांची अवहेलना कधी थांबणार...वैचरिक लेख...

 





शिक्षकांची अवहेलना कधी थांबणार...वैचरिक लेख.....

भारत सुसंस्कृत देश मानल्या जातो पुर्वीपासुन आपल्या देशाच्या प्रगतीमधे शिक्षकांचे ( गुरूचे ) स्थान खुप महत्वाचे आहे. उदा. रामायण, महाभारत, या पवित्र ग्रंथ असो किंवा सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, किंवा पेशवे यांच्या काळातही राज्य कारभारात गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व होते याबाबत इतिहास सुद्धा पुरावा आहे. परंतु आजच्या काळात सगळीकडे सतत शिक्षकांना अवहेलना सहन करावी लागत आहे. जसे जसे काळ, सृष्टी, समाज हा आधुनिक तंत्रज्ञानानुसार बदलत आहे तसे शिक्षण व ज्ञानदानाच्या पध्दतीनुसार शिक्षकही बदलत अपडेट झाला आहे. काळानुसार बदल करणे हा निसर्गाचा नियम आहे.

            आज शिक्षकांचा पगार हा सर्वांसाठी कुतूहलाचा, तसाच ईर्षेचा विषय झाला आहे. अगदी *गल्ली ते दिल्ली* त्याची चर्चा आहे.शासनाच्या वर्गवारीनुसार शिक्षक वर्ग ३, क या संवर्गात येतात (अ आणि ब वर्गांची) चर्चा होत नाही, मात्र *(क-वर्ग)* सर्वांना खुपतो. त्याचे कारण काय आहेत...

  १. शासकिय सेवेनुसार लाखों सरकारी कर्मचाऱ्यां तुलनेत शाळेच्या संख्येत शिक्षकांची संख्या जास्त आहे.

  २. शिक्षकांचा सरळ संपर्क लोकांशी न येता त्यांच्या लहान मुलांशी येतो. शिक्षक हा विद्यार्थी केंद्रीत असतो.

   ३. समाज हा स्वतः चा स्वार्थ जेथे आहे तेथे सन्मानाची वागणूक देतो. शिक्षकांवाचून कुणाचं काही आडत नसल्याने त्याचे महत्त्व सर्वसामान्य जनतेत कमी झाले आहे.

 ग्रामसेवक, तलाठी, पोलिस, लिपीक इत्यादी, कर्मचाऱ्यांचा आदर होतो. कारण त्यांच्याकडे लोकांची कामे अडकलेली असते म्हणून त्यांना सतत साहेब साहेब संबोधल्या जाते. शिक्षक मात्र मास्तर वगैरे. वगैरे....

शासकीय व न्यायालयीन भाषेत शिक्षक हा नोकर नाही. तो एक समाजसेवक आहे तो समाजातील भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सतत झटत असतो. सतत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटतो. शासकिय सेवेतील एकमात्र शिक्षक हा असा कर्मचारी आहे तो दुसऱ्याच्या मुलांच्या प्रगतीमध्ये स्वतःचा आनंद निर्माण करतो. त्याला सतत वाटते माझे 100% विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावे, इतरांच्या मुलांची प्रगती व्हावी असा निस्वार्थ विचार फक्त शिक्षकच करतो हे दृश्य हा आनंद इतर कोणत्याही कार्यालयात इतर कर्मचाऱ्यात आपणाला बघायला मिळणार नाही. स्वतःच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत चांगली शाळा चांगले शिक्षक पालक शोधतात. पण शिक्षकांचा पगार व सुटीचा विषय आला की समाज त्याची अवहेलना करतो याला कोणती संस्कृती म्हणायची. विशेष म्हणजे शिक्षकाच्या पेशात भ्रष्टाचारास वाव नाही. त्यांना वेळेचे बंधन कटाक्षाने पाळावे लागते. वर्गातील शेकडों शेतकरी मजूर कुटुंबातून आलेल्या विविविध जडणघडणीतल्या मुलांना समजून घेऊन कोणताही भेदभाव न करता योग्य वळण देऊन सुसंस्कृत व आदर्श नागरिक निर्माण करण्याचे कार्य शिक्षक सतत करत असतो. बाहेर हा जो सुव्यवस्थीत जो समाज दिसतो ना, तो शिक्षकांच्या शिक्षणाचाच परिणाम आहे. एकीकडे शिक्षणाचे महत्त्व मान्य करायचे आणि त्या शिक्षणाचा कणा असलेला शिक्षक याचा उपमर्द करायचा ही कोणती मानसिकता...!

उठसूट कुणीही शिक्षकांबद्दल बोलत आहे. शिक्षकांना काम नाही, फुकटचा पगार घेतात........ कोरोना महामारी काळातही कोणत्याही सुविधा नसतांना आहे त्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना स्वतःच्या कौशल्याने आँनलाईन व आँफलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षक सतत धडपड करतांना दिसला. एवढेच नव्हे तर शिक्षकांनी घरोघरी जाऊन , मंदिरात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले 

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुटुंब सर्वेक्षण केले, गावात जाऊन लसिकरण जनजागृती करत चेक पोष्ट, बाजार अशा ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात पोलिसांसोबत सेवा दिली. काही मुख्याध्यापक व शिक्षक यांनी तर कोरोणा काळात सुध्दा शाळा सुरू करून सोईसुविधा नसलेल्या गरिब वंचित घटकातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले एवढे सर्वकाही सामाजिक हिताचे सत्कार्य करूनही शिक्षकांच्या पदरी काय पडते तर फक्त अवहेलना... आणि अवहेलना.     

                  शेकडों वर्षे शिक्षक साधेपणाने जगत होता तेव्हा तो महान होता परंतु परिस्थिती नुसार शिक्षकांच्या राहणीमानात बदल पडला तो निसर्गाचा नियमच आहे, शिक्षक नियोजन व काटकसरीने जगुन त्यांच्या कडे दोन पैसे दिसू लागले तर लोकांना पोटशूळ उठायला लागले. करोडोंचा भ्रष्टाचार करणारे नेते तुम्हाला चालतात त्यांना आपण सन्मानपूर्वक वागणूक देतो त्यांच्यापुढे शेपूट घालतो. भ्रष्टाचार करून करोडोंची संपत्ती कमावणारे अधिकारी तुमच्यासाठी आदरणीय साहेब असतात. आणि तुमच्या चिमुकल्यांना आईच्या मायेने आणि बापाच्या धाकाने सुसंस्कृत वळण लावणारे आदर्श नागरिक निर्माण करून समाज घडविण्याचे काम करणारे शिक्षक मात्र मास्तरडे... इतर कर्मचारी व अधिकारी यांच्या तुलनेत शिक्षक हा डी.एड, बी. ए. बी. एड, बी. एस्सी. बी. एड, एम ए,एम एड, पि एच डी असा सुशिक्षित असतो. आयुष्यातील पंचवीस वर्षे शिक्षण घेण्यात घालवलेले असतात. पुन्हा पाच वर्षे शिक्षण सेवक किंवा बिनपगारी, असतो, सरते शेवटी मुलांचे चांगले शिक्षण व चांगले लग्न कार्य करत कर्जबाजारी होऊन एक स्वतः चे एक घर करतो एवढीच त्यांची संपत्ती तरीही समाजाला शिक्षकाचा पगार दिसतो व त्याची अवहेलना होते हि खुप मोठी विसंगती आहे......


दिवसभर एक मिनिट देखील उशीर न करता आपल्या वर्गावर जाऊन नजरेला नजर भिडवून शिकवणारा, सतत विद्यार्थ्यांसमोर आदर्श असणारा घसा कोरडा होई पर्यंत बोलत राहणारा, मायेच्या ममतेने विद्यार्थी जोपासना करत दिवसभर विद्यार्थ्यांची जबाबदारी घेत, सतत उभा राहून शिकवणारा शिक्षक काय इतका.. हीन आहे.. की कुणीही उठसूट त्याची अवहेलना करावी ??  

              दोन वर्षं कोरोना काळात मुले घरी होती शिक्षणापासून वंचित होती तर वेगवेगळ्या तत्वज्ञानांनी कबुल केले कि विद्यार्थ्यांंमधे अनेक वाईट सवयी लागल्या, शारिरीक मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे, विद्यार्थ्यांची खुप मोठी हानी झाली आहे. अनेक पालकांनी शाळा सुरू व्हाव्यात यासाठी सुध्दा मागणी केली म्हणजे हे सिद्ध होते की विद्यार्थ्यांंचा शारिरीक व बौद्धिक विकास हा शिक्षकच करू शकतो तरी मग आपण शिक्षकांची अवहेलना करणे म्हणजे किती केविलवाणा प्रयोग म्हणावा.

जिल्हा परिषद शाळेला वाईट दिवस आले असताना सुद्धा कित्येक मुख्याध्यापक, शिक्षक यांनी स्वतः कठोर परिश्रम घेत वेगवेगळे उपक्रम राबवित स्वबळावर विद्यार्थी संख्या वेगाने वाढवून लोकवर्गणीतून शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे , शिष्यवृत्ती नवोदय परिक्षेत यश मिळवत गुणवत्ता निर्माण करून आंतरराष्ट्रीय , आदर्श शाळेचा दर्जा निर्माण केला आहे ही बाब सुद्धा प्रशंसनीय व वंदनीय आहे. कित्येक प्रकारची अशैक्षणिक सरकारी कामे, उपक्रम, योजना शिक्षक प्रामाणिकपणे राबवित जनजागृती करीत आलेला आहे..

बाल मानसशास्त्र नुसार मुलांना सुट्टी म्हणून शिक्षकांना सुट्टी मिळते तर ह्यात काय नवल पण त्यावरही समाज त्याची ईर्ष्या करतो. इतर सगळ्या नोकऱ्या सुशिक्षित समाज अधिकारी पदाधिकारी संपूर्ण परिवर्तन हे शिक्षणामुळे आहेत. शिक्षक हा शिक्षणाचा कणा आहे. याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे. ज्या देशात शिक्षकांच्या कर्तृत्वावर शंका घेत त्यांना खोटारडे संबोधत अशोभनीय अवहेलना करून प्रगतिची अपेक्षा करत असाल तर यापेक्षा शोकांतिका आणखी काय असणार ..

       भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांच्या प्राथमिक शिक्षकापासुन तर उच्च शिक्षण देणारे सर्व शिक्षक सन्मानाने बोलावले होते आज माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विचाराची नितांत गरज आहे. शिक्षक आदर मागत नाही परंतु तो त्याच्या निस्वार्थ शैक्षणिक कार्यामुळे आदरास पात्र आहे , त्यांचा आदर जर करता आला नाही तर हरकत नाही पण शिक्षकांची अवहेलना करने कुठेतरी थांबाली पाहिजे हेच माझे समाजाला नम्रपणे मागणे आहे......

💟💢जि प शाळा बोराखेडी यशोगाथा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💢कोरोना काळातील शैक्षणिक कार्य पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💢विविध शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथेक्लिक करा

अनिल चव्हाण राज्य शिक्षक पुरस्कृत मुख्याध्यापक आंतरराष्ट्रीय आदर्श जि प शाळा बोराखेडी ता मोताळा जि.बुलढाणा

9767866933, 7796228888



Post a Comment

0 Comments