Subscribe Us

किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर , शिंदे सरकारने सुरु केली , CM किसान सन्मान योजना ! आता शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12,000/- रुपये .

 


 किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर , शिंदे सरकारने सुरु केली , CM किसान सन्मान योजना ! आता शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12,000/- रुपये .

                            महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे . ती म्हणजे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना धर्तीवर आता राज्य शासनाची मुख्यमंत्री किसान योजना अंतर्गत वर्षाला 12,000/- रुपये मिळणार आहे . म्हणजेच आता शेतकऱ्यांना वर्षातुन तीन वेळा 4,000/- रुपयांचे तीन हप्ते मिळणार आहे .ही योजना राज्य शासनाकडुन सुरुवात करण्यात येणार आहे . महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारकडुन ही योजना सुरुवात करण्यात आली आहे .


                      भारतात  प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000/- रुपये तीन हप्त्यामध्ये अदा करण्यात येते . केंद्र सरकारकडुन ही योजना 2018 पासुन लागु करण्यात आली आहे .या योजनेचा शेतकऱ्यांना 12 वा हप्ता लवकरच मिळणार आहे .राज्यामध्ये शिंदे गट व भाजपाची सत्ता आल्याने , केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान सन्मान योजना लवकरच चालु करण्यात येणार आहे . या योजनेचे निकष प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसारखेच असणार आहेत , परंतु या योजनेमध्ये अधिकांश शेतकऱ्यांना लाभ मिळावा . या उद्देशाने निकषामध्ये थोडी शिथिलता देण्यात येणार आहेत .

                                        आजरोजी  प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000/- रुपये मिळत आहेत . तर मुख्यमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत देखिल 6,000/- रुपये मिळणार आहेत . यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकुण 12,000/- रुपये मिळणार आहेत .म्हणजेच वर्षातुन तीन वेळा 4,000/- रुपयांचे तिन हप्ते शेतकऱ्यांना मिळणार आहेत .

                                                      महाराष्टात मुख्यमंत्री किसान सन्मान योजना चालु करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्वत: मान्यता देण्यात आलेली असुन , येत्या बजेटमध्ये सदर योजनेसाठी आर्थिक तरतुद करण्यात येणार आहे .यामुळे आता शेतकऱ्यांना दुप्पट आर्थिक लाभ मिळणार आहे .शेतकऱ्यांकडुन या योजनेचे स्वागत करण्यात येत आहेत .


💢SBI अंतर्गत कर्मचारी भारती पाहण्यासाठी येथेक्लिक करा  

💢स्पर्धा परीक्षा प्रश्नावली पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

💢कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments