Subscribe Us

New Update सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होणार भरमसाठ वाढ !

 



 New Update सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होणार भरमसाठ वाढ !


            सध्या लागू असलेल्या सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अनेक पदांच्या पगारामध्ये तफावत असल्याने कामगार युनियनकडुन पगारवाढीसाठी / पुढील वेतन आयोगासाठी मागणी करण्यात येत आहे. आठवा वेतन आयोग / पगारवाढ करणेबाबत कर्मचारी संघटनांकडुन एक प्रस्ताव देखिल तयार करण्यात आलेला असून , सदर प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे .यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु होण्याची चिन्हे दिसुन येत आहेत. 

        सातव्या वेतन आयोगाच्या अनेक पदांच्या पे फिक्सेशन मधे अनेक त्रुटी आहेत याबाबत अनेक संघटना यांनी निवेदन दिले असुन त्यात दूरूस्ती ची अपेक्षा आहे. परंतू सदर दूरूस्ती ह्या आता 8 व्या वेतन आयोगात होतील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे 

किमान मुळ वेतनामध्ये होणार वाढ !

      देशातील कामगार युनियनकडुन फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करणेबाबत मोठी मागणी करण्यात आलेली असून, सरकार वर दबाव आणला जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मुळ वेतन मिळते, तर या फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी कामगार युनियनकडुन करण्यात आली असून सदर मागणीवर कामगार युनियनकडुन जोर धरण्यात आली असल्याने कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे किमान मुळ वेतन 18,000/- मिळते, सदर फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 पट वाढ लागु केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनामध्ये आठ हजार रुपये वाढ होणार आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान मुळ वेतन हे 26,000/- रुपये होईल.


            8 व्या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनामध्ये 3.68 पट म्हणजेच 44.44% वेतनवृद्धी होणार आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये भरपूर मोठी वाढ होणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 14.29% वेतनवृद्धी करण्यात आलेली होती. सदर वेतन आयोगासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेणार असल्याची विशेष सुत्रांकडून समजले आहे, तसेच केंद्र सरकारने असा निर्णय घेतल्यास इतर राज्य सरकार देखील नवा वेतन आयोगाचा स्विकार करतील व राज्य कर्मचारी यांना 8 व्या वेतन आयोगाची भरपूर मोठी वाढ मिळेल.


💢राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात येथे सविस्तर वाचा

💢20 पेक्षा कमी पटाच्या शाळांचे समायोजन कार्यवाही सुरु येथे वाचा

💢राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या TA-DA भत्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत, शासन निर्णय येथे वाचा  

Post a Comment

0 Comments