Subscribe Us

Good News : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या भत्याच्या TA-DA दरामध्ये सुधारणा करणेबाबत, वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित ! GR दि.07.10.2022



Good News : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या TA-DA भत्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत, वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित ! GR दि.07.10.2022

                      महाराष्ट्र  राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी आली आहे .सातव्या वेतन आयोगानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भत्त्याच्या दरांमध्ये सुधारणा करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन आज दि.07 ऑक्टोंबर 2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्गमित झाला आहे .या संदर्भातील वित्त विभागाचा दि. 07.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णयातील महत्वाची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .


              महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांमध्ये सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .सदर निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र अधिकारी / कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव दौऱ्यावर असताना दिल्ली , मुंबई , कोलकाता , चैन्नई , बंगळुर , हैद्राबाद शहरातील हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास देय असलेल्या दैनिक भत्ताच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे .सदर दैनिक भत्ता कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतनस्तरानुसार दैनिक भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे .

            वेतन श्रेणीस्तर एस – 30 व त्यापेक्षा अधिक वेतनस्तरामधील अधिकारी / कर्मचाऱ्यांना हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास 7500/- रुपये + 1200/- रुपये भोजन व संकीर्ण खर्च करीता दैनिक भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे . तसेच एस – 25 ते एस – 29 मधील वेतनस्तरातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास 4500/- रुपये + 1000/- रुपये भोजन व संकीर्ण खर्च करीता दैनिक भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे .


 तसेच वेतन श्रेणी स्तर एस –20 ते एस –24 मधील वेतनस्तरातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास 2250/- रुपये + 800/- रुपये भोजन व संकीर्ण खर्च करीता दैनिक भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे .तर एस – 19 व त्यापेक्षा कमी वेतनस्तरामधील अधिकारी / कर्मचाऱ्यांना हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास 1000/- रुपये + 500/- रुपये भोजन व संकीर्ण खर्च करीता दैनिक भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे .



💢दैनिक भत्ता वाढ संदर्भातील सुधारणा करणेबाबतचा वित्त विभागाचा दि.07.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करारा


💢राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 38% महागाई भत्ता व वाढीव सण अग्रीम वाढ सविस्तर येथे वाचा

Post a Comment

0 Comments