राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 38% DA महागाई भत्ता व वाढीव सण अग्रीम मिळणार
महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व निवृत्तीवेतधारक कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापुर्वीच सरकारकडुन मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता दाट आहे. कारण मागील आठवड्यात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के वाढ लागु केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता एकुण 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे .
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शासकीय / निवृत्तीवेतनधारक व राज्य कर्मचाऱ्यांना 4 टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ दिवाळी सणापुर्वी देण्यात यावा अशी मागणी राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडुन करण्यात आली आहे . महाराष्ट्रातील शिंदे सरकार यांना महाराष्ट्र विधानपरीषदेचे आमदार नागो गानार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तात्काळ महागाई भत्ता व वाढीव दिवाळी सण अग्रीम द्यावे यासाठी विशेष पत्र लिहीले असुन , यामध्ये नमुद करण्यात आले आहे कि ,राज्य कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत 38 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात यावा.तसेच सण अग्रीम वाढवून देण्यात यावा यासाठी प्रत्र दिले आहे, विशेषत : महागाई दर वाढत असून राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ लवकरात लवकर लागु करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी महागाई भत्ता व वाढीव सण अग्रीम देण्याबाबत शिंदे सरकार सकारात्मक असून येत्या कँबिनेटमधे चर्चा करून आवश्यक निर्णय निर्गमित होतील असे आश्वासन दिले आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळी पुर्वी महागाई भत्ता व वाढीव सण अग्रीम दिल्यास यांचा बाजारपेठ व व्यावसायिकांवर सकारात्मक परिणाम होतो. म्हणून राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी पुर्वी महागाई भत्ता व वाढीव सण अग्रीम निश्चितच मिळणार आहे.
💟💢शिक्षक बदली बाबत अपडेट मिळवण्यासाठी येथे वाचा
0 Comments