Subscribe Us

जिल्हाअंतर्गत बदली Teacher-transfer प्रक्रिया 2022 संदर्भातील हाती आलेले महत्त्वाचे अपडेट.

 




जिल्हाअंतर्गत बदली Teacher-transfer प्रक्रिया 2022 संदर्भातील हाती आलेले महत्त्वाचे अपडेट. 

शिक्षक बदली बाबत अपडेट काय.....

शिक्षक बदली होणार का......

शिक्षक बदली प्रक्रिया यशस्वी होणार का.....

बदली केंव्हा होणार.....

असे अनेक प्रश्न निर्माण शिक्षकांच्या मनामध्ये आहे याबाबत सविस्तर माहिती आवश्यक वाचा 

महाराष्ट्रात शासनाने जिल्हांतर्गत शिक्षक बदलीसाठी पोर्टल वरील प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.मुंबई ग्रामविकास विभागाच्या आदेशाची वाट बदली पोर्टल काम करणारे विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड हे बदली प्रक्रिया सुरू करण्यासाठी पाहत आहेत.

 ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांची हिरवी झेंडी मिळताच जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाइन जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सुतोवाच केले आहे 


महाराष्ट्रातील शिक्षक बदली प्रक्रिया संदर्भात ग्रामविकास विभागाकडून माहिती घेतली असता जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू करणे बाबतचे ग्रामविकास विभागाचे पत्र तयार आहे परंतु माननीय ग्रामविकास मंत्री यांची सहमती मिळाली की पत्र निर्गमित होईल व बदली प्रक्रिया सुरू होईल व शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.

शिक्षक बदली बाबत मुंबई ग्रामविकास विभागाकडून बदली संदर्भातील शासन निर्णय निर्गमित होताच जिल्हाअंतर्गत बदलीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा संवर्गनिहाय उपलब्ध होईल, ग्रामविकास विभागाने या अगोदरच परिपत्रक निर्गमित करून कोणत्या संवर्गासाठी किती दिवस अर्ज भरण्यासाठी उपलब्ध होतील याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.


जिल्हाअंतर्गत शिक्षक बदली  ऑनलाइन बदल्या यावर्षी होतील की नाही? याबाबत अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांकडून विचारणा होत आहे.


महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षकांच्या मनात असे संभ्रम आहेत त्यांना असे सांगावे वाटते की जिल्हांतर्गत ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी संपूर्ण तयारी झालेली असून ग्रामविकास मंत्र्यांची हिरवी झेंडी मिळताच जिल्हा अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू होणार आहे याबाबत निश्चिंत रहावे. असे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

याअगोदर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये शासनाविरोधात अनेक न्यायालयीन प्रकरणे समोर आलेली असल्यामुळे यावेळी कुठलीही तांत्रिक बाजू मागे न राहता निर्दोष पणे बदली प्रक्रिया पार पडावी यासाठी अतिशय काळजीपूर्वक बदली प्रक्रिया राबविणे सुरू असल्यामुळे बदली प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होत आहे. परंतु बदली पोर्टल सुरू होणार याबाबत शिक्षणमंत्री यांनी लक्ष घातले तर शिक्षक बदली लवकरच सुरू होणार याबाबत 💢काही शंका नाही 

मुख्याध्यापक प्रभारबाबत सविस्तर वाचा येथे वाचा

💣महागाई 38% भत्ता व पेन्शन लागू करणेबाबत महत्त्वाची अपडेट येथे वाचा

💬घरभाडे भत्ता बंद होणार याबाबत सविस्तर माहिती येथे वाचा

Post a Comment

0 Comments