नवीन विहिरीसाठी शेतकऱ्यांना अडीच लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार.
शेतकऱ्यांना विशेष सहाय्य म्हणून शेतीसाठी महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे पाणी, पाण्याच्या योग्य वापराने शेतीही अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला करता येते व त्यातून उत्पादन सुद्धा भरघोस मिळते. कोणतेही पिक पाणी शिवाय जगू शकत नाही. त्यामुळे शेतीच्या पाण्याच्या नियोजनासाठी शेतकरी पाण्याचा साठा हा विहिरीच्या माध्यमातून करत असतात. विहिरीमध्ये पाण्याचा साठा करून गरजेनुसार पाणी शेतकरी शेतामध्ये वापरतात. तरीपण अजून सुद्धा बघायचे झाले तर बऱ्याच ठिकाणी कोरडवाहू शेती आहे. त्या ठिकाणी पाण्याची नियोजन करण्यासाठी विहिरीचे खोदकाम करण्यासाठी येणारा खर्च पाहून शेतकरी थोडे मागे सरक आहेत. कारण शेतकऱ्यांना हा विहिरीच्या खोदकामाच्या खर्च परवडत नाही.
याच गोष्टीवरती विचार करून शासनाने विहीर बांधणी अनुदान जाहीर केले आहे. त्यामध्ये शासन आपल्याला विहीर बांधण्यासाठी अनुदान देत आहे. यासोबतच जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन साठी सुद्धा शासन अनुदान देत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. कृषी सामाजिक समावेशक सेवा पंधरावडा शासनामार्फत साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे दोन आक्टोंबर 2022 पर्यंत तुम्ही शेती संबंधित वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज करू शकता. जर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला त्याच्या लाभ नक्की मिळेल.
नवीन विहीर काढण्यासाठी शासनामार्फत अनुदान मिळणारच यासोबतच शासनामार्फत इतर योजना सुद्धा राबवल्या जात आहे. त्याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती घेऊया.
१) नवीन विहीर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये
२) जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये
३) इनवेल बेरिंग साठी वीस हजार रुपये
४) पंप संच घेण्यासाठी 20000 रुपये
५) वीज जोडणी आकार यासाठी दहा हजार रुपये
६) शेततळ्यामध्ये प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी एक लाख रुपये
७) ठिबक सिंचन साठी 50 हजार रुपये
८) तुषार सिंचन साठी 25 हजार रुपये
९) पीव्हीसी पाईप साठी तीस हजार रुपये
तर अशाप्रकारे योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकतो. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजनेअंतर्गत मिळवा नवीन विहिरीसाठी अनुदान.
अनुसूचित जाती व जमाती या वर्गातील शेतकरी बंधू भगिनींचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असतात.
यापैकीच मित्रांनो एक महत्त्वाची योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर बांधणी जुनी विहीर दुरुस्ती, तुषार सिंचन, ठिबक सिंचन यांवरती योजना चा लाभ देण्यात येणार आहे.
या प्रवर्गातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींना कृषी विभागाच्या योजना ची माहिती देण्यासाठी यासोबतच योजनांमध्ये सहभाग घेण्यासाठी 2 ऑक्टोबर पर्यंत शासनामार्फत कृषी सामाजिक समावेशक सेवा पंधरावडा साजरा करण्यात येत आहे.
त्यामुळेच जे काही अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकरी बंधू भगिनी असतील त्यांनी शासनाच्या महाडीबीटी या पोर्टल वरती कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना यांच्या अंतर्गत, यासोबतच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विविध शेती संबंधित शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत. असे आवाहन कृषी अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
अर्ज करण्यासाठी सर्वात आधी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलला भेट द्या
त्या ठिकाणी तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
लॉगिन केल्यानंतर अर्ज कसा करावा असा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असा त्या ठिकाणी पर्याय दिसेल त्यासमोर असलेल्या विविध बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा
असे केल्यानंतर तुम्हाला एक सूचना दिसेल ती वाचावे आणि खाली ओके बटणावर क्लिक करा
ज्यावेळी तुम्ही ओके बटनावरती क्लिक करा त्यावेळी त्या ठिकाणी तुमचा गाव तालुका जिल्हा गट नंबर इत्यादी माहिती विचारल्याप्रमाणे अचूक भरायचे आहे
माहिती भरून झाल्यानंतर बाब या पर्यायावर क्लिक केल्यानंतर योजनांचे लिस्ट तुम्हाला दिसेल त्यापैकी योजना निवडून अर्ज सादर करून घ्या.
आवश्यक कागदपत्रे पहा कोणती लागणार
सक्षम प्रांताधिकारी यांच्याकडील अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र सातबारा खाते उतारा
तहसीलदार यांच्या वतीने दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती लाभार्थ्याचे प्रमाणपत्र
अपंग अर्जदार असेल तर त्याचे प्रमाणपत्र
सामायिक एकूण धारणा क्षेत्र बाबतचा दाखला तलाठी यांच्याकडे दाखला झिरो 0.40 ते 6 हेक्टर चहा दि मध्ये विहीर नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे ज्या जागेवरती विहीर घेणे आहे. ज्या जागेवरती विहीर घ्यायचे आहे त्या जागेचा नकाशा व चतु:सीमा त्या जागेपासून पाचशे मीटर अंतरावर विहीर नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
पाणी उपलब्धतेचे जे काही प्रमाणपत्र असतील ते त्या ठिकाणी जोडावे. यासोबतच सर्वेक्षण विकास यांच्याकडील कृषी अधिकारी यांची क्षेत्रीय पाणी यासोबतच शिफारस पत्र गटविकास अधिकारी याचीसुद्धा शिफारस पत्र त्या ठिकाणी लागेल.
ज्या जाग्यावरती विहीर घ्यायचे आहे, त्या जागेचा फोटो त्या ठिकाणी लागेल आणि तो फोटो महत्त्वाच्या खुणा सह. यासोबत लाभार्थी सह ग्रामसभेचा ठराव आवश्यक असणार आहे.
💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💟💢माहिती अधिकार दुरूपयोग बाबत तक्रार येथे सविस्तर वाचा
0 Comments