Subscribe Us

जि प शाळा बोराखेडी येथे विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ देऊन सुट्टीचा निरोप..

 


जि प शाळा बोराखेडी येथे विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ देऊन सुट्टीचा निरोप.....

आदर्श जिल्हा परिषद मराठी शाळा बोराखेडी येथे सतत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास तसेच शालेय शिस्त संस्कार यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांप्रती स्नेह आपुलकी याच एक छान उदाहरण मोताळा लगत असलेल्या जिल्हा परिषद बोराखेडी येथील शाळेत तेथील नाविन्यपूर्ण उपक्रमातून सातत्याने दिसून येते. आज शाळेतील प्रथम सत्राचा शेवटचा दिवस आहे , आजपासून दिवाळी सुट्टी लागत आहे. याचे औचित्य साधून मुख्याध्यापक अनिल चव्हाण व शिक्षक यांनी आज दिवाळी सुट्टीच्या शेवटच्या दिवशी kg-1 ते 8 वी 470 विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले चिवडा जिलबी उसळ असा फराळ वाटप करून विद्यार्थ्यी परत आनंदाने हसत खेळत बागडत शाळेत येण्याच्या आशा पल्लवित करत दिवाळीच्या गोड शुभेच्छा देत निरोप घेतला. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांना मुख्याध्यापक यांनी मिठाई देऊन दिवाळीच्या गोड शुभेच्छा दिल्या. 

                    बोराखेडी शाळेत ग्रामीण भागातील गरिब वंचित घटकातील विद्यार्थी शिक्षण घेतात या फराळाच्या निमित्ताने त्यांना सुध्दा एक वेगळा व छोटासा आनंद देण्याचा व आपल्या शाळेविषयी शिक्षक व विद्यार्थी यांना स्नेह व आपुलकी असावी यासाठी हा उपक्रम 7 वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. तसेच 50 अत्यंत गरिब ज्यांना आई किंवा वडील नाही अशा विद्यार्थ्यांना कपडे वाटप सुध्दा करण्यात आले. आज सुट्टीचा शेवटच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र मनसोक्त कला कार्यानुभव या विषयावर आकाश कंदील, भिंगरी, यांचे प्रात्यक्षिके बनविण्याची कार्यशाळा संपन्न झाली. फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी याबाबत मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी सखोल मार्गदर्शन केले. अशा पध्दतीने वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व कला गुणांना वाव देण्यासाठी शाळेतील शिक्षक सौ अनुप्रिता व्याळेकर सौ सुनिता हुडेकर सौ वामिंद्रा गजभिये सौ सिमा गोरे सुनिता न्हावकर संध्या नाईक जया चव्हाण सुनंदा इंगळे शितल तायडे दिपाली गोलाईत गब्बरसिंग पावरा हे सातत्याने सहभागी होतात.

Post a Comment

0 Comments