Subscribe Us

राज्य कर्मचाऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास आर्थिक लाभ मंजुर करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित ! GR दि.12.10.2022

 


राज्य कर्मचाऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास आर्थिक लाभ मंजुर करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित ! GR दि.12.10.2022


राज्य शासन सेवेतील वन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना वन वणवा , वन्यप्राणी हल्ला , वन तस्कर / शिकारी यांच्या हल्यात तसेच वन्य प्राण्यांना बचाव करतांना मृत्यु झाल्यास व कायमचे अपंगत्व आल्यास त्यांचे वारसास लाभ देण्याबाबत महसूल व वन विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.12.10.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील महसूल व वन विभागाचा दि.12.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .


वन , वणवा , वन्यप्राणी हल्ला , वन तस्कर / शिकारी यांच्या हल्यात तसेच वन्य प्राण्यांच्या बचाव करताना मृत्यू पावलेल्या / कायमचे अपंगत्व आलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वारसांना खालीलप्रमाणे नुकसान भरपाई तसेच इतर सोयी सुविधा मंजूर करण्यात येत आहेत .यामध्ये वर्ग अ मधील अधिकारी मृत्यु पावल्यास 25,00,000/- लाख रुपये तर कायमचे अपंगत्व आल्यास 3,60,000/- रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात येत आहे .वर्ग ब मध्ये कार्यरत अधिकारी मृत्यु पावल्यास 25,00,000/- लाख रुपये तर कायमचे अपंगत्व आल्यास 3,00,000/- लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत . त्याचबरोबर वर्ग क व वर्ग ड मध्ये कार्यरत कर्मचारी मृत्यु पावल्यास वारसास 25,00,000/- लाख रुपये तर कायमचे अपंगत्व आल्यास 3,00,000/- रुपये मंजुर करण्यात येत आहे .


त्याचबरोबर मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी / कर्मचारी यांचा राज्यांतर्गत औषधोपचारांचा व शस्त्रक्रियेचा रुग्णालयातील सर्व खर्च राज्य शासनातर्फ देण्याची तरतुद सदर निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहे .त्याचबरोबर जखमी वन अधिकारी /कर्मचारी यांचा राज्यांतर्गत औषधोपचारांचा व शस्त्रक्रियेचा रुग्णालयातील सर्व खर्च राज्य शासनातर्फ देणेबाबत निर्णय देण्यात आला आहे .हा निर्णय सदरचा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येणार आहे


💢संदर्भातील महसुल व वन विभागाचा दि.12.10.2022 रोजीचा शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202210121128100319 ) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

💢8 व्या वेतन आयोगात पगारात मोठी वाढ सविस्तर येथे वाचा

Post a Comment

0 Comments