जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली 2022 बाबत महत्वाचे मुद्दे
💢बदली वर्ष 2022:-
*सर्वसाधारणपणे बदली वर्ष हे ३० मे पर्यंत धरण्यात येते परंतु ४ मे २०२२ रोजी काढलेल्या पत्रानुसार यावर्षी हे बदली वर्ष ३० जून पर्यंत वाढविण्यात आलेले आहे.*
💥बदलीसाठी धरावयाची सेवा :-
अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३० जून पर्यंत झालेली एकूण सेवा.
💢सक्षम अधिकारी :-
शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम अधिकारी राहील
💢बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक :-
ज्या शिक्षकांची शाळा अवघड क्षेत्र मध्ये असेल व एकूण सेवा 3 वर्षे झालेली असेल असे शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक असतील
🎯बदली पात्र शिक्षक :-
सर्वसाधारण क्षेत्र +अवघड क्षेत्र+ कार्यरत जिल्ह्यात सलग सेवा १० वर्ष पूर्ण + विदयमान शाळेत सेवा ५ वर्ष पूर्ण बदली पात्र शिक्षक
कार्यरत जिल्ह्यात सलग सेवा १० वर्ष पूर्ण विदयमान शाळेत सेवा ५ वर्ष पूर्ण
संवर्ग निहाय शिक्षकांना किती शाळा भरता येणार तसेच बदली कशी होणार याची माहिती खाली दिलेली आहे.
💖विशेष संवर्ग भाग 1 :
💥पसंतीक्रम : विशेष संवर्ग भाग १
🎯शासन निर्णयात नमूद प्राधान्य क्रम, सेवाज्येष्ठता, जन्मतारीख, आडनावातील पहिले इंग्रजी वर्णश्वर यानुसार प्राधान्य दिले जाईल.
🎯सिस्टमद्वारे बदली प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा सुधारित रिक्त पदांची यादी जाहीर केली जाईल.
🎯शिक्षकांना त्यांचा विनंतीवरूनच बदली देण्यात येईल
🎯या अंतर्गत शिक्षकांची बदली बदलीपात्र शिक्षकांच्या जागी होईल.
🎯विशेष संवर्ग 2 :
🎯विशेष संवर्ग भाग २ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम देण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात येईल.
💢कमीतकमी १ शाळा व जास्तीत जास्त ३० शाळांचे पसंतीक्रम देणे आवश्यक आहे.*
🎯पती पत्नी दोघे ही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकतो.*
💥बदली अधिकार प्राप्त शिक्षक ( संवर्ग 3 )
💥बदली अधिकार पात्र शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम देण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात येईल.
💢३० शाळांचा पसंतीक्रम देणे आवश्यक आहे.
💢बदलीपात्र शिक्षक ( संवर्ग 4 )
💢पसंतीक्रम : बदलीपात्र
💢सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करून, बाकी सर्व शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात येईल.
🎯सेवाज्येष्ठता, जन्मतारीख, आडनावाती पहिले इंग्रजी वर्णाक्षर यानुसार प्राधान्य देऊन पसंतीप्रमाणे बदली होईल*.
🎯विस्थापित शिक्षक :
पसंतीक्रम : विस्थापित शिक्षक
🎯सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करून, उरलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी / बदलण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात येईल.
🎯या शिक्षकांनी ३० अथवा रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य आहे.
💢स्तनदा माता गरोदर महिलांना सोयीची बदली निर्णय येथे डाउनलोड करा
💢बदली पोर्टल वेळापत्रक बाबत शासन निर्णय येथे डाउनलोड करा
💢राज्य कर्मचाऱ्यांना 38% महागाई भत्ता शासन निर्णय येथे डाउनलोड करा
0 Comments