Subscribe Us

वाचन प्रेरणा दिनाला 11000 रू ची पुस्तके भेट... पुस्तक वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा आदर्श जि प शाळा बोराखेडी

 


 भेट...एक तास पुस्तक वाचन करून "वाचन प्रेरणा दिन" साजरा आदर्श जि प शाळा बोराखेडीवाचन प्रेरणा दिनाला 11000 रू ची पुस्तके


 भेट...एक तास पुस्तक वाचन करून "वाचन प्रेरणा दिन" साजरा आदर्श जि प शाळा बोराखेडीवाचन प्रेरणा दिनाला 11000 रू ची पुस्तके


    आदर्श जि शाळा बोराखेडी येथे भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना डॉ कलाम यांच्या जिवनचरित्रावर मार्गदर्शन केले.  आजचा दिवस विशेष ठरला तो म्हणजे आदर्श बोराखेडी शाळेतील जेष्ठ शिक्षिका आदरणीय अनुप्रिता व्याळेकर मँडम यांनी शालेय ग्रंथालयास 11000 रूपयांची 360पुस्तके भेट दिली ‌‌. आज व्याळेकर मंडम यांनी दिलेल्या पुस्तकांचे शाळेतील, सर्व विद्यार्थ्यांनी एक तासभर वाचन करून खऱ्या अर्थाने डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. तसेच आज हंन्ड वाँश डे असल्यामुळे विद्यार्थ्यांना नियमितपणे हात धुण्यासाठी सहा क्रिया असतात त्यांचे सामुहिक प्रात्यक्षिके करून मार्गदर्शन केले.

                    आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे सतत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. तसेच शिक्षक वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना सातत्याने शैक्षणिक साहित्य वाटप करून शैक्षणिक विद्यार्थ्यांना सहकार्य केले जाते. व्याळेकर मँडम यांनी दिलेल्या शालेय ग्रंथालयात विद्यार्थ्यांना नेहमी वाचन करण्यासाठी कथा, कविता, थोर पुरूष, डिक्शनरी, सामान्य ज्ञान, अशी शैक्षणिक पुस्तके निर्माण झाली आहे . तसेच आजपासून रोज *एक तास वाचनासाठी* हा शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे रोज एक वर्ग सायंकाळी 4 ते 5 या वेळेत वर्गशिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील पुस्तके वाचन करून घेतील, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची विविध प्रकारची पुस्तके वाचली जाणार असुन विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे हे निश्चित.

  💢 शिक्षक बदली कोरे अर्ज येथे डाउनलोड करा

💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💟💢माहिती अधिकार दुरूपयोग बाबत तक्रार येथे सविस्तर वाचा

Post a Comment

0 Comments