जिल्हा अंतर्गत बदली 2022 :- बदली पात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांची यादी जाहीर
ऑनलाइन जिल्हा अंतर्गत बदली पोर्टलवर जिल्ह्यातील एकूण कार्यरत शिक्षकांपैकी जिल्हा अंतर्गत बदली करीता बदलीपात्र ( सध्याच्या क्षेत्रातील सेवा 10 वर्ष व शाळेवरील सेवा 5 वर्ष ) ठरलेल्या 1715 तसेच बदली अधिकार पात्र (2017 चे शासन निर्णयानुसार अवघड क्षेत्र घोषित केलेल्या शाळेवरील 3 वर्ष सेवा ) अशा 64 शिक्षकांची यादी याद्वारे बदली पोर्टल मध्ये सर्वांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच सुलभ संदर्भासाठी pdf स्वरुपात सुद्धा आपले संकेतस्थळाचे माध्यमातून देण्यात येत आहे
सर्व बदलीपात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांनी सदरील यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी.
या संदर्भाने काही त्रुटी असल्यास सर्वप्रथम आपले तालुका कार्यालयाशी रीतसर लेखी अर्ज व कागदोपत्री पुरावेनिशी संपर्क करावा.
लवकरच जिल्हांतर्गत बदली संदर्भाने फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे , फॉर्म भरण्याअगोदर सर्व शिक्षकांनी GR चे काळजीपूर्वक वाचन करुन घेण्यास सांगावे. ग्रामविकास विभागाकडून निर्गमीत शासन परिपत्रक, Vinsys कडून पोर्टलवर असणारे अधिकृत videos तसेच जिल्हा कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सुचना यावरूनच आपला फॉर्म भरण्यास सांगावे. इतर ठिकाणी दिलेल्या सुचनेनुसार कार्यवाही केली व त्यामुळे जर बदली मध्ये काही चूक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत शिक्षकांची राहील याबाबत सर्वांना अवगत करावे.
💢बुलढाणा जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांची यादीयेथे डाउनलोड करा
💟💣शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल द्वारे होणार सविस्तर येथे वाचा
0 Comments