जिल्हातंर्गत शिक्षक बदली अपडेट 11 नोव्हेंबर 2022
➡️ *व्हिन्सीस कडुन जिल्हांतर्गत बदलीसाठीच्या बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकारप्राप्त शिक्षक याद्या राज्यातील सर्व मा.EO लॉगिनवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सदर याद्या जिल्हा स्तरावरून जिल्हा शिक्षण विभागाकडून शिक्षकांसाठी तालुका निहाय प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत
➡️ *लवकरच नवीन वेळापत्रक शासनस्तरावरून निर्गमित होण्याची शक्यता आहे.*
➡️ *जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत राज्य सरकार कडून दिलेली अपडेट.*
➡️ *राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर बदल्यांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठीचे पोर्टल 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार होते परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे
बदल्यांच्या वेळापत्रकामध्ये किरकोळ बदल करून सदर तारखा उद्या जाहीर करून बदल्यांची ही प्रक्रिया 5 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे*
➡️ *बदली पात्र शिक्षकांच्या याद्या व बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर संवर्ग 1 व संवर्ग 2 ला होकार किंवा नकार देण्यासंदर्भात तारखा जाहीर होतील*
➡️ *संवर्ग 1 व संवर्ग 2 च्या याद्या संवर्ग 1 व संवर्ग 2 च्या शिक्षकांनी होकार किंवा नकार दर्शविल्यानंतरच जाहीर होतील*
➡️ *खालील प्रक्रिया संभाव्य तारखांमध्ये सुरू होऊ शकते*
➡️ *24 ते 26 नाव्हेंबरपर्यंत विशेष संवर्ग 1 मध्ये येणाऱ्या शिक्षकांनी होकार दर्शविल्यास तीन दिवसांत पोर्टलवर 1 ते 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पसंतीक्रम नोंदवता येईल*
➡️ *संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास, पूर्वीचीच शाळा कायम राहील.*
➡️ *विशेष संवर्ग भाग-2 साठी प्राधान्यक्रम भरण्याची मुदत 1 ते 12 डिसेंबरपर्यंत राहील.*
➡️ *त्यामध्ये 30 शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवता येईल. प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास, विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांची बदली होणार नाही. त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहील.*
➡️ *तसेच ज्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांना 8 ते 12 डिसेंबरपर्यंत प्राधान्यक्रम भरता येणार आहे*
➡️ *30 शाळांचा प्राधान्यक्रम 3 दिवसांत ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा लागणार आहे.*
➡️ *दरम्यान, बदली नको असल्यास, तसेच बदलीपात्र शिक्षक नसल्यास, प्राधान्यक्रम न भरल्यास शिक्षकाची बदली होणार नाही - असे शासनाकडून कळविण्यात आले*
💢बदली पात्र शिक्षकांची यादी येथे सविस्तर वाचा
💢शिक्षक वेतन विलंब झाल्यामुळे शिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस येथे सविस्तर वाचा
💢येथे सविस्तर वाचा जुनी पेन्शन लागू करणेबाबत महत्त्वाची अपडेट येथे सविस्तर वाचा
0 Comments