जिल्हाअंतर्गत बदली अपडेट-अद्यापही शिक्षक लॉगिन बंद का? सविस्तर वाचा
*दिनांक 6 नोव्हेंबर 2022*
*जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया वेळापत्रकानुसार सुरू होणार होती दिनांक 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना बदली संदर्भात पोर्टलवर होकार किंवा नकार नोंदवायचा होता परंतु वेळापत्रकानुसार अद्यापही शिक्षकांकरिता लॉगिन सुरू करण्यात आले नाही*
*सदर लॉगिन फक्त CEO,EO व गटशिक्षणाधिकारी यांच्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे*
*अद्यापही जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात खालील कामे पूर्ण न झाल्यामुळे शिक्षकांकरिता लॉगिन सुरू करण्यात आले नाही*
*पोर्टलवर आपणास खालील कामे action in process मध्ये दाखवल्या जात आहेत अर्थातच अजून पर्यंत अधिकारी लॉगिन चे काम पूर्ण झालेले नाही*
*करिता शिक्षकांनी चिंतित न होता वेळापत्रकानुसार ठरवलेला तीन दिवसांचा कालावधी आपणास वाढवून देण्यात येईल*
*समानीकरणांतर्गत ठेवायच्या रिक्त जागा ठरविणे*
*31 डिसेंबर 2022 पर्यंत सेवानिवृत्त होणारे किंवा मयत अथवा इतर कारणांनी रिक्त होणाऱी संभाव्य रिक्त पदे ठरविणे*
*बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या व बदली पात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर करणे*
*शासनादेशानुसार वेळापत्रकानुसारच बदल्या होतील असे सांगण्यात आले असले तरीही या वेळापत्रकामध्ये खूप मोठा फेरबदल होऊ शकतो*
संवर्ग 1 बाबत प्रमाणपत्र पडताळणी करणे
रिक्त पदांची व अवघड क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर करणे
एकाच वेळी बदली सुरळीत पुणे चालू राहील याबाबत पोर्टल मधे अपडेशन सुरू आहे
*शिक्षक लॉगिन केव्हा सुरू होईल यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत सूचना नाही तरीसुद्धा शिक्षकांना त्या संदर्भात कार्यालयाकडून लॉगिन सुरू होण्यासंदर्भात अधिकृत सूचना दिल्या जातील*
*लवकरच बदली पोर्टल सुरू होणार याबाबत अधिकृत माहिती शेअर होईल
1 Comments
🤦🤦😭😭😭
ReplyDelete