Subscribe Us

नववर्षाच्या शुभेच्छा सह शब्दरूपी आनंदमय भेट....



नववर्षाच्या शुभेच्छा सह शब्दरूपी आनंदमय भेट....

.............आयुष्य बघता बघता सरत चाललय...

तसे दिवस सारे सारखेच....

पण कुठेतरी ब्रेक...

आणि पुन्हा नव्याने सुरवात.... यासाठीच तर हे नवीन वर्ष.... जसे पहिल्या पावसाच्या सरी बघुन मन आनंदाने प्रफुल्लित होते अखेर...

आणि वर्षेभर बरच काही देऊन जाते....

पाऊस तर तोच असतो तरी कुठे आनंद....

तर कुठे थोड दुःख देऊन जातो.. तरी परत पाऊस कधी येतो याची आपण वाट बघतोय ना........

म्हणून यावर्षी आपल्या आनंद मिळाला कि दुःख तरी आपण नविन वर्षाचं स्वागत करून आनंदाने जगायचे आहे...

त्यामुळेच तर माणूस प्रत्येक वर्षी नव्यानं जन्माला येतो.नवे संकल्प करतो. मागील वर्षात झालेल्या जखमा, वाईट घटना, काही शल्ये दुःख सारंच विसरून पुन्हा मनात नविन आशा , नविन संकल्पना नवे धेय, नवी पालवी निर्माण करतो.... 🙂💕

तसं हे आयुष्य पॉपकॉर्न सारखं हलकं फुलकं आणि काहीस खारट, तिखट नमकिन पण चविष्ट व छान असतं........पण आपण उगाचंच त्याला अवजड व बेचव बनवून ठेवतो. एक वर्ष संपतं तस आपल्या आयुष्यातील एक वर्ष कमी होतं. म्हणून जिवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायचे....

आयुष्यात दोन नविन दिवस आनंदात जगता आले पाहिजे..नाही तर पुन्हा मग आयुष्याचं गणित नव्यानं मांडल जातं. असं करतंच आयुष्यातील शेवटचं वर्ष कधी येत हे कळतंही नाही.... आणि आपण किती आनंद घेतला कसे जगलो याची बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार करून उत्तर मिळते.... शुन्य...‌अखेर....शेवट....म्हणजे सगळं संपलेल असतं ......आणि मग आठवते कि आपल जगायच राहीलेल असतं..... 🙂

म्हणूनच तर आजचा क्षण माझा म्हणून जगता यायला हवा..... वर्षातला प्रत्येक क्षण तसा आपल्यासाठी नवाच असतो.

तो समजून घेतला तर....

तो नव्याने जगता येतो...

म्हणूनच जे मागे गेलं तो कधीही न दिसणारा कधीही उपयोगी नसणारा भूतकाळ अस समजून छान,मजेत,आनंदात जगता यायला पाहिजे...🙂

जिवन जगतांना प्रत्येक वेळी डोक्याने नव्हे तर ते हृदयाने भावनेनं जगता आलं पाहिजे... 🙂💕

बस कुणाला न दुखवता जगता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ‌.... 🙂💕

शक्य असल्यास इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न केले पाहिजेत....🙂💕

प्रामाणिक कर्तव्य पार पाडता पाडता कर्तव्यात आनंद घेता आले पाहिजेत... 🙂💕

प्रेम,निष्ठा, नियमितता, विश्वास, आपुलकी, संयम , मर्यादा, सत्यता, या सर्व मुल्यांना स्विकारून वास्तव्यात जगता आलं पाहिजेत.... 🙂💕

स्वार्थाबरोबर परमार्थ साधत आनंदाने जगता आलं पाहिजेत... 🙂💕

पुढची किती वर्षे आपल्या आयुष्यात आहेत हे कोणालाच ठाऊक नसतं....

म्हणूनच जो दिवस समोर येईल तो छान जगावा. दु:खं,वेदना,अडचणी साऱ्यांनाच असतात...

पण त्यातूनही लढून जिंकता आलं की,आयुष्य सार्थकी लागतं. 

म्हणूनच....नवा दिवस...नवे वर्ष...नव्याने जगा....

जगाला शक्य तितका आनंद द्या....

आनंद घ्या...‌.

कारण.....

आनंद हीच आयुष्याची गुरुकिल्ली आहे......

जगता आल पाहिजे... याबाबत चार ओळी....


नातं रकताच असो कि प्रेमाचं जपता आले पाहिजे

जन्म मिळाला एकदाच ते आनंदाने जगता आलं पाहिजे..... 

द्वेष,मत्सर ,लोभ, या भावनांचा नको जिवनात कुठेच थारा....

सदैव मनात वाहु द्या आपुलकीचा वारा....

सहवासात लाभले जिवन हे निस्वार्थपणे घालवता आले पाहिजे ...‌.

नातं रकताच असो.....

मनापासून मनाचे धागे विणल्या जातात भावनांचे....

सुविचाराचे तंत्र जुळून येतात शब्दांने...

दुःखी मनाच्या भावना जाणता आल्या पाहीजे

नातं रक्ताच असो की प्रेमाचं जपता आलं पाहिजे....

व्यक्ती तेवढे विचार प्रकृतीचे असतील प्रकार..

या विचारांच्या भाऊगर्दीत माणूस ओळखता आला पाहिजे

नातं रक्ताच असो की प्रेमाच जपता आलं पाहिजे....

 लग्न गाठीचे बंध 

आपले जगण्याचे बनले विश्व..

अजानत्यालाही आपण मानतो आपलं सर्वस्व..

अबोल मनाचे भाव ओळखला आलं पाहिजे 

नातं रक्ताच असो की प्रेमाच जपता आलं पाहिजे.....

जगण्याच्या या जिवन शैलीत मिळतात अनेक व्यक्ती

36 कोटी देवावर असते ज्यांची भक्ती..

उभा ठाकला समोर तुमच्या जिव्हाळ्याचा वनवा विझवता आलं पाहिजे

नात रक्ताच असो की प्रेमाच जपता आलं पाहिजे.....

खरच जिवन खूप सुंदर आहे बस जगता आलं पाहिजे.....

खरं तर आयुष्याला पॉपकॉर्न बनवा....

सदैव त्याची आनंदरूपी जव चाखा.. 🙂💕 

एकवार पंखावरूनी फिरव तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात या भावगीतातील ओळीप्रमाणे आपण आपल्या कर्तृत्वाने, सकारात्मक विचाराने प्रेमाने इतरांच्या मनात निस्वार्थी आपल्या विषयी छोटंसं घरट निर्माण करण्यासाठी सातत्याने आपुलकीने जगू या..

अशी संकल्पना या नव्या वर्षात करूया.....

आकांक्षा चे पंख लेऊनी घेऊ भरारी उंच आकाशात...

कर्तृत्वाला येऊन झळाळी यश मिळावे या वर्षात..

आपणास नूतन वर्षाच्या आनंदमयी हार्दिक शुभेच्छा!....

आपला स्नेही

अनिल चव्हाण

राज्य शिक्षक पुरस्कृत मुख्याध्यापक आदर्श जि प शाळा बोराखेडी 

Post a Comment

0 Comments