| ![]() | ![]() ![]() | ||
|
*"पुस्तक वाचा बक्षीस मिळवा" शाळा बंद काळातील नाविण्यपूर्ण उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ......
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक मुल शिकले पाहिजे हे शिक्षणाचे खास उद्दीष्टे आहे. परंतू सध्या शाळा पुर्ण पणे बंद आहे
,अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय जि प शाळा बोराखेडी येथील शिक्षक संकटांवर मात करत विद्यार्थी गुणवत्तेसाठी नवनविन उपाय शोधत आहे. आंतरराष्ट्रीय जि प शाळा बोराखेडी येथील मुख्याध्यापक अनिल चव्हाण सतत गरीब वंचित विद्यार्थ्यांना नववीन उपक्रमांच्या माध्यमातून ज्ञान रूजविण्याचा प्रयत्न करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने धडपड
करत आहे. २६ जून पासुन गावात विद्यार्थ्यांना स्वाध्याय पेपरच्या माध्यमातून शिक्षण असो की समाजमंदिरात शाळा असो परिस्थिती चा
आढावा घेत मास्क सँनिटायझर सोशल डिस्टंगशिंग चे सर्व नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू आहे.गावात
शिक्षक येतात हे बघुन विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे, मार्च महीन्यापासु विद्यार्थी शाळेपासून दूर आहे त्यांना आता शिक्षक व शाळा याची
ओढ निर्माण झाली आहे. शाळा सुरू होण्यासाठी सध्या तरी प्रतिक्षा करावी लागेल परंतू विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहु नये या सकारात्मक
विचाराने बोराखेडी येथील मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी घरच्या घरी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे "पुस्तक वाचा बक्षीस
मिळवा" या उपक्रमात विद्यार्थी आपल्या घरीच पालकांना जवळ घेऊन एक पुर्ण पुस्तक वाचन करतील पालक मुख्याध्यापक किंवा शिक्षक
यांना फोन करून सांगतील मुलाने पुर्ण पुस्तक वाचन केले.यानंतर मुख्याध्यापक हे पालकांशी कोणत्या विषयाचे पुस्तक,किती वेळात,वाचन
केले याची शहानिशा झाल्यानंतर तो विद्यार्थी बक्षीसास पात्र ठरविण्यात येतो व त्या मुलाला घरपोच वही पेन हे बक्षीस दिल्या जाते. पुस्तक
वाचन करत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे पालकांचे रोजचे मुख्याध्यापक शिक्षक यांना फोन सुरु झाले आहे. या उपक्रमात
विद्यार्थ्यांमधे वाचनाची आवड निर्माण होऊन आकलनशक्ती वाढून स्वयंअध्ययनाची सवय लागत असून बक्षिस मिळण्याची उत्सुकतेपोटी
विद्यार्थ्यांमधे स्पर्धा निर्माण झाली आहे.गंम्मत अशी आहे की या उपक्रमामुळे विद्यार्थी स्वत: आपला अभ्यासक्रम एका महिन्यात पुर्ण करतात.
पुस्तक वाचा बक्षीस मिळवा या उपक्रमाचे उद्दिष्ट एवढेच की ग्रामिण भागातील विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात गुंतून असावा कोरोनाच्या काळात
शाळा बंद असली तरी शिक्षण सुरू असावे. या उपक्रमात शिक्षक सौ अनुप्रिता व्याळेकर, सौ सुनिता हुडेकर, सौ वामिंद्रा गजभिये ,सौ सिमा
गोरे, महेंद्र तायडे हे घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत, यामुळे विद्यार्थ्यांना पालकांना मोठा
दिलासा मिळाला आहे.*
0 Comments