Subscribe Us

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत पहील्या टप्यात तब्बल 75 हजार जागांसाठी मेगाभरती जाहीर ! राज्य शासनाची मोठी घोषणा .

 


         महाराष्ट्र राज्य शासन सेवेत पहील्या टप्यात तब्बल 75 हजार जागांसाठी मेगाभरती जाहीर ! राज्य शासनाची मोठी घोषणा .

        💢महाराष्ट्र राज्य शासन सेवेत पहिल्या टप्यामध्ये तब्बल 75 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राज्य शासनाकडुन राबविण्यात येणार आहेत . कोरोना महामारीमुळे राज्य शासन सेवेत आरोग्य विभाग वगळता इतर विभागामध्ये पदभरती राबविण्यात आलेली नसल्याने , इतर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागांची संख्या वाढली आहे .यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण होत आहे , परिणामी प्रशासकीय कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे .


             💢तसेच राज्यामध्ये मागील 3 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची मोठी पदभरती प्रक्रिया झालेली नसल्याने राज्यांमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे . यासाठी राज्य शासनाकडुन राज्य लोकसेवा आयोगामार्फत 100 टक्के रिक्त जागांची पदभरती राबविण्यात येणार आहेत . तर वर्ग – 3 व वर्ग -4 संवर्गातील रिक्त पदांपैकी 50 टक्के जागा तात्काळ भरण्यात येणार आहेत . सदर रिक्त असलेल्या पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया डिसेंबर अखेर पुर्ण करण्यात येणार आहे .

          💢आजरोजी राज्य शासन सेवेत 2.50 लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत . यामध्ये गृह विभाग , जलसंपदा विभाग , आरोग्य विभाग , शालेय शिक्षण विभाग या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत . यामुळे या विभागांमध्ये मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . सदर पदांवर भरती प्रकिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियामध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे .

        💢वरील भरती बाबत सविस्तर माहीती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी विधानभवनात बोलताना सांगितले कि ,वर्षभरामध्ये राज्य शासन सेवेतील रिक्त पदांपैकी 75 हजार जागांवर भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल .यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना राज्य शासन सेवेत नोकरीची मोठी संधी मिळणार आहे .


💢स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे क्लिक करा


💥शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments