राज्य शासनाचा मोठा निर्णय या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू
राज्य शासन सेवेत 2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे . जुनी पेन्शन योजनेची मागणी राज्य कर्मचाऱ्यांकडुन मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे . कल्याण डोंबविली पालिका अंतर्गत 2005 पुर्वी रुजु झालेल्या कायम कर्मचाऱ्यांना जुनी पेन्श योजना लागु करणेबाबत पालिका प्रशासनाकडुन टाळाटाळ करण्यात येत होती . यामुळे सदर कर्मचाऱ्यांकडुन जुनी पेन्शन लागु करणेबाबत वारंवार मागणी होत होती .
सदर मागणीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन सकारात्मक विचार करुन कल्याण डोंबिवली पालिका मध्ये 2005 पुर्वी पालिका प्रशासनामध्ये कायमस्वरुपी रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना 1982 ची महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन लागु करण्यात आली . सदरचा निर्णय मुख्यमंत्री व कल्याण डोंबिवली पालिकाच्या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यां बरोबर मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला .
त्याचबरोबर 18 वर्षांपासुन कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणेबाबत मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन घेण्यात आला .सदर निर्णयाचे पालिका कर्मचाऱ्यांकडुन स्वागत करण्यात आले .यामध्ये प्रामुख्याने कंत्राटी वाहक , कंत्राटी चालक ,कंत्राटी शिपाई अशा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजु करुन घेणेबाबत महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला
सदर निर्णयानुसार 18 वर्षांपासुन कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 59 आहे . या कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .याबाबत कल्याण डोंबिवली पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले
💢बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत येथे क्लिक करा
💢शिक्षक बदली बाबत 26 आँगष्ट 22 चा महत्वाचा शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा
💟💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments