विदयार्थ्यांच्या अभ्यासासाठी ‘या’ स्ट्रीक्स महत्वाच्या ; अभ्यास कसा करावा, केलेला अभ्यास कसा लक्षात ठेवावा, अभ्यास करण्याची योग्य वेळ व अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी ?
अभ्यासाची योग्य वेळ असावी…
💢 विद्यार्थी मित्रांनो वेळ कुणासाठी थांबत नाही, म्हणून आपण आपल्या सोयीनुसार आपला अभ्यास पुर्ण करणे आवश्यक आहे. कारण अभ्यास करण म्हणजे आपल्या ज्ञानात भर टाकते होय ते आपण प्रत्येक क्षणी शिकत असतो म्हणजे आपल्या ला अभ्यास करण्यासाठी वेळ ठरवणं अवघड नाही
तसं पाहायला गेलं तर तुम्ही अभ्यास करू शकता,जेव्हा मन लागेल तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकता पण जर तुमचे अभ्यासात चित्त, मन लागत नसेल तर सकाळची शांत वेळ अभ्यासासाठी योग्य आहे. कारण सकाळी वातावरणात शांतता असते तसेच रात्रभर झोप झाल्याने शरीर आणि मन दोघेही अतिशय फ्रेश असते. म्हणून सकाळच्या वेळी अवघड वाटणारे विषयांचा अभ्यास केल्यास लक्षात राहण्यास मदत होते.
💢अभ्यासाची उत्सुकता आवश्यक…
आवड महत्वाची आहे मग आपल्या ला आपल्या शिक्षणात आवड निर्माण करणे आवश्यक आहे यासाठी आपण आवडते तो विषय, पुस्तक ,कथा , अशा प्रकारचे पुस्तके वाचन करावी म्हणजे आपल्याला अभ्यासाची सवय लागते.
अभ्यासात चित्त लागण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे उत्सुकता कारण मनाची तयारी आणि उत्सुकता नसेल तर सोपी गोष्ट सुद्धा तुम्हाला समजू शकणार नाही किंवा तुमच्या लक्षात येणार नाही.कारण जर अभ्यासाला बसण्याची तुमची इच्छाच होत नसेल तर कोणतेही उपाय करून फायदा नाही. म्हणून सर्वात आधी तुम्हाला अभ्यासाप्रति उत्सुकता स्वतःमध्ये निर्माण करावी लागेल
शरीर व मनाला एकदम ताजे करा. यानंतर अभ्यासाठी टेबल खुर्ची या सारख्या उंच वस्तू घ्या. पुरेसे उजेड आणि शांतता असलेल्या रुम मध्ये पाठीचा कणा ताठ करून अभ्यासाला एकाग्रतेने बसा.
💢अभ्यासात नियमितपणा असावा…
कोणतीही गोष्ट जर तुम्ही नियमित करत असाल तर काही दिवसांनी शरीराला त्या गोष्टीची सवय होऊन जाते. जरी सुरुवातीला तुमचे मन अभ्यासात लागत थोडं अवघड वाटत असेल तर काही दिवसातच तुम्हाला दररोज अभ्यास करण्याची चांगली सवय होऊन जाईल व तुम्हाला अभ्याची गोडी आपोआप निर्माण होईल. पण या साठी तुम्हाला सातत्य ठेवावे लागेल… नियमितता असल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. सातत्याने कार्य करणे म्हणजे आपण आपल्या मार्गावर आहोत हे सिद्ध करणे होय.
💢डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण आदर्श घेऊ शकतो, डॉ बाबासाहेब हे अठरा अठरा तास अभ्यास करत होते.
अभ्यासाला बसण्याआधीच सर्व अडथळे दूर करावे. घरच्यांना या गोष्टीची कल्पना देऊन द्यावी की तुम्ही अभ्यास करीत आहात व किमान एक तास तरी तुम्हाला आवज देऊ नये. मोबाईल, टीव्ही सारख्या अडथळ्यांना पण स्विच ऑफ करून ठेवावे.
💢 वाचण्या सोबत लिखान करा…
जर परत परत वाचून सुद्धा तुम्हाला शंका आहे की तुम्ही वाचलेले परत विसरू शकतात तर तुम्ही वाचन करण्यासोबत लिखाण पण करू शकतात. किंवा वाचन पूर्ण झाल्यावर पुस्तकात न पाहता आपल्या वहीत उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा या पद्धतीने अभ्यास केल्यास अभ्यास लक्षात ठेवायला नक्की उपयोग होईल.
लेखन कौशल्य हे विद्यार्थ्यांमधील एक उत्तम कौशल्य आहे म्हणजे सुप्त गुणांना जपणे होत व विचारांना चालना देणे म्हणजे लेखन सराव करणे आवश्यक आहे
💢मनाची एकाग्रता आवश्यक…
सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट आहे एकाग्रता. कोणतीही गोष्ट पूर्ण एकाग्रतेने केल्यास त्याचे लाभ नक्कीच होतात. चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी शांत मन आणि एकाग्रतेचा आवश्यकता आहे.
या साठी तुम्ही ध्यान आणि योग प्राणायाम करू शकतात. अभ्यासाला बसण्यापूर्वी 10 मिनिटे कोणताही विचार डोक्यात येऊ देऊ नका, आपले चित्त श्वासावर एकाग्र करा, श्वास कश्या पद्धतीने आत बाहेर होत आहे ते अनुभव करा.
💢 ध्येय ठरवा… उराशी स्वप्न बाळगा…
अभ्यास असो वा इतर कोणतेही कार्य त्याला उत्कृष्ट पद्धतीने करण्यासाठी एका ध्येयाची आवश्यकता असते. या साठी तुम्हाला स्वयं प्रेरित व्हावे लागेल. तुम्हाला शिक्षण घेऊन भविष्यात काय व्हायचे याबाबत आयुष्यात एक स्वप्न ठरवू शकतात आणि त्या दिशेने आपली वाटचाल करून आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मेहनत घेऊ शकतात.अभ्यास करण्यासाठी वर दिलेल्या स्ट्रीक्स तुम्ही अंमलात आणल्यास तुम्हाला नक्कीच अभ्यासात गोडी निर्माण होईल.
💢डॉ एक पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितले आहे स्वप्न असे बघा कि तुम्हाची झोप उडायला हवी , झोप न लागणे ते खरे स्वप्न.
💢स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे क्लिक करा
💢सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे क्लिक करा
💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments