NEET UG 2022 निकालाची प्रतीक्षा संपली; 'या' दिवशी जाहीर होणार निकाल
NEET UG Result 2022 : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट 2022 (NEET UG Result 2022) चा निकाल 7 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाऊ शकतो. अधिकृत वेबसाइट nta.nic.in वर निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार त्यांचा निकाल पाहू शकतात. NEET UG उत्तरपत्रिका (NEET – UG 2022 Answer Key) प्रसिद्ध झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने बुधवारी संध्याकाळीNEET-UG 2022 ची उत्तर पत्रिका, स्कॅन केलेल्या OMR इमेज आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्स जारी केले आहेत. यासोबतच अधिसूचना जारी करताना त्याची संपूर्ण प्रक्रियाही सांगण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती करिअर समुपदेशन तज्ञ पारिजात मिश्रा यांनी एबीपी न्यूजशी (ABP News) बोलताना सांगितलं की, तसेच जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नीट यूजी 2022 (NEET 2022 Result) चा निकाल 7 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या OMR शीटची स्कॅन केलेली प्रत आपणास दोन प्रकारच्या लिंकवरून मिळू शकेल. अर्ज क्रमांक, जन्मतारीख टाकून आणि अर्ज क्रमांक, पासवर्ड टाकून स्कॅन कॉपी घेता येईल.
परीक्षेसंदर्भातील महत्त्वाची माहिती
NEET-UG 2022 ची परीक्षा 17 जुलै रोजी झाली होती, ज्यामध्ये 18 लाख 72 हजार 342 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
2022 मधे NEET परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.
NEET 2022 ही परीक्षा भारतातील 483 केंद्रांवर आणि 14 परदेशी शहरांमधील 3570 केंद्रांवर घेण्यात आली होती.
याचवेळी परदेशात, परीक्षा अबू धाबी, बँकॉक, कोलंबो, दोहा, काठमांडू, क्वालालंपूर, मनामा, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर, दुबई आणि कुवेत येथे घेण्यात आली होती.
NEET-UG 2022 चा निकाल कसा पाहाल?
सर्वात आधी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nta.nic.in वर भेट द्यावी.
होम पेजवर दिलेल्या NEET UG निकाल 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
तिथे मागितलेली माहिती सबमिट करा. (रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड इत्यादी)
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
तुम्ही डाऊनलोड करुन निकालाची प्रिटंही काढू शकता.
NEET Answer Key 2022 : नीट आंसर-की कशी कराल डाऊनलोड?
- नीट आंसर-की जारी केल्यानंतर वेबसाईट neet.nta.nic.in वर भेट द्या.
- NEET answer keys 2022 या आयकॉनवर क्लिक करा.
- आपला अप्लिकेशन नंबर, पासवर्ड इत्यादीनं लॉगइन करा आणि आवश्यक माहिती भरा.
- तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट करा. त्यानंतर अँन्सर की तुमच्यासमोर ओपन होईल.
💢विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याबाबत टिप्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे क्लिक करा
💢शिक्षक बदली बाबत माहिती येथे क्लिक करा
0 Comments