विद्यार्थ्यांना पुरेशी झोप होण्यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा तयारीत शिक्षण मंत्री केसरकर यांची माहिती
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ कुटुंबातील संस्कार शिकण्यासाठी मिळावा व विविध कारणामुळे शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा होमवर्क बंद करण्याची तयारी सुरु आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून तज्ञांशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांना झोपायला पुरेसा वेळ मिळावा म्हून शिक्षण विभाग प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याच्या तयारीत आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
विशेष मुद्दे ;-
विद्यार्थ्यांना झोपायला वेळ मिळणार
शाळांच्या वेळा बदलण्याच्या तयारीत
शिक्षणमंत्री केसरकर यांची माहिती
शालेय लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार करता, सकाळच्या टप्प्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा (Primary School Times Change) बदलण्याचा विचार सुरू आहे. शहरांमध्ये दोन ते तीन शिफ्टमध्ये शाळा सुरू असल्याने याबाबतचा अंतिम निर्णय हा तज्ज्ञ, संस्थाचालक आणि शिक्षकांशी बोलून घेण्यात येईल’, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली. शिक्षकांना निवडणूक आणि जनगणनेची कामे वगळता इतर अशैक्षणिक कामे देण्यात येणार नाहीत, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
विशेष विद्यार्थी कार्यक्रमात शाळा भेटीदरम्यान प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित शिक्षक संवाद आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी केसरकर बोलत होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव आदी उपस्थित होते. या वेळी शिक्षकांनी वेतनेतर अनुदान, अशैक्षणिक कामे, परीक्षा सुरू करा, अभ्यासक्रमात मूल्यशिक्षण आणा, छत्रपती शिवाजी महाराज ते महादजी शिंदे यांचा इतिहास सामाविष्ट करा, क्रीडा धोरण अशा विविध मुद्द्यांवर संवाद साधला.
शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले, ‘लहान मुलांना झोपेची जास्त आवश्यकता असते. या मुलांची शालेय जीवनातील सुरुवातीची वर्षे महत्त्वाची असून, या काळातच मेंदूचा जास्त विकास होतो. मात्र, राज्यात शाळांच्या वेळा सकाळी सात वाजेपासून असून, अभ्यासाच्या दडपणामुळे मानसिक ताण जादा येतो. त्यामुळे या मुलांची व्यवस्थित झोप होऊन, त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर सकाळच्या टप्प्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू आहे. याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.’
प्राथमिक शिक्षण उत्तम व्हावे म्हणून शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे शिक्षकांना केवळ निवडणूक आणि जनगणनेशी संबंधित कामे देण्यात येणार आहे. ही कामे देण्यापूर्वीही महसूल विभागात कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेण्यात येईल. त्यानंतरच ही कामे देण्यात येतील.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर, म्हणाले बदलत्या काळानुसार राज्याच्या शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य पातळीवर सल्लागार समिती किंवा मंडळाची स्थापना करण्याची आवश्कता आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक गुणवत्ता उत्तम ठेवणाऱ्या शाळांना स्वायत्त दर्जा देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा, अशी भूमिका डॉ. एकबोटे यांनी मांडली.
💢जिल्हा अंतर्गत बदली बाबत 19/9/22 चा महत्त्वाचा शासन निर्णय वाचण्यासाठी येथे क्लिक करा
💥आकारिक चाचणी वर्ग १ ते ४ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢केंद्र प्रमुख पदोन्नती माहिती सादर करणेबाबत शिक्षणाधिकारी यांचे आदेशयेथे वाचा
💢मुख्यालयी home allowance राहण्याची अट रद्द करणार मा. ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री वृत्त येथे क्लिक करा
0 Comments