सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 38% महागाई भत्ता वाढ झाली आहे तसेच पेन्शन योजना लागू करण्याबाबत चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहेत . याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबरोबर आठवा वेतन आयोगाबाबतच्या चर्चेला मोठे उधाण येत आहेत .शिवाय जुनी पेन्शन योजनाची सरकारी कर्मचाऱ्यांकडुन मोठी मागणी होताना दिसत आहे .जुनी पेन्शन योजनेसाठी अनेक राज्यातील कर्मचाऱ्यांकडुन आंदोलने होत आहेत .यातच कर्मचाऱ्यांना आठवा वेतन वेळेवर लागू व्हावा याबाबत सर्व कर्मचारी संघटनेला मोठी चाहुल लागलेली आहे .
सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा भारतीय ग्राहक निर्देशांकाच्या आधारे ठरवला जातो .या निर्देशांकानुसार महागाई भत्ता मधील वाढ केंद्र सरकारकडुन निश्चित करण्यात आली , केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार महागाई भत्ता मध्ये वाढ करते .
मागिल काही महिन्याच्या ग्राहक निर्देशांकामध्ये मोठी वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 4 टक्के ते 5 वाढविण्यात आला आहे. सध्याच्या महागाईचा विचार केला असता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करण्याच्या मागणी कामगार युनियनकडुन होत आहे . मिडीया रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मुळ वेतनाशी संबंधित फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी केंद्रीय कामगार युनियन कडुन होत आहे .
यामुळे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील मुळ वेतनामध्ये वाढ होऊन नविन वेतनप्रणालीनुसार वेतन आहरित करण्यात येईल .फिटमेंट फक्टर मध्ये वाढ लागु केल्यास , साहजिकच कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होईल. याबाबतची अधिकृत्त घोषणा केंद्र सरकारकडुन निवडणुकांच्या जवळपास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे .
तसेच महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक जवळजवळ निश्चित आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 4% महागाई भत्ता व मुळ वेतनात वाढ करून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत व राज्य कर्मचारी यांना पेन्शन योजना लागू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
💢शिक्षक बदली बाबत अपडेट येथे वाचा
💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लि
💢राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ३८% महागाई भत्ता सविस्तर माहिती येथे वाचा
0 Comments