Subscribe Us

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चिंतेची बाब सप्टेंबर पासून घरभाडे भत्ता बंद करणार?




सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चिंतेची बाब सप्टेंबर पासून HRA घरभाडे भत्ता बंद करणार?

             राज्यात सरकारी सेवेत कर्मचारी शासन सेवेत ग्रामीण भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी वेतनामध्ये घरभाडे भत्ता मिळत असतो. परंतु अनेक भागामधील नागरीक तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडुन वारंवार तक्रार होते कि , कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत .यामुळे या विषयाकडे आता प्रशासनाने ठोस पाऊले उचलले आहेत . जे कर्मचारी मुख्यालयी राहणार नाहीत . अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनामधुन घरभाडे भत्ताच थांबविण्याचे आदेश प्रशासनाकडुन निर्गमित करण्यात आले आहेत.

       महाराष्ट्रात मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निलेश गटणे यांनी सर्व विभागप्रमुखांना पत्र निर्गमित करुन निर्देश दिले आहे कि , जे कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास राहणार नाहीत . अशा कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्यांपासुन घरभाडे भत्ता थांबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शिवाय जे कर्मचारी शिक्षक मुख्यालयी राहणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याचे आदेश औरंगाबादचे सी.ई.ओ श्री.निलेश गटणे यांनी दिले आहेत. यासाठी आता कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ताचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्रामसभेचा ठराव प्राप्त करुन घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर भाडेच्या जागत राहत असल्याचे भाडेकरार केल्याचे दस्तऐवजाची कागतपत्रे सादर करावे लागणार आहे.


              तसेच मुख्यालयी कर्मचाऱ्यांची उपस्थितीबाबत बायोमेट्रीक हजेरी तसेच आकस्मिक पडताळणी यारख्या बाबींचा अवलंब करण्याचे निर्देश सदर आदेशांमध्ये देण्यात आलेले आहेत . जे कर्मचारी मुख्यालयी वास्तव्य करणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता रोखण्यात येणार आहेत .जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र जिल्हा परिषद , जिल्हा सेवा नियम 1967 मधील नियम / अटी व शर्तीच्या तरतुदींचे भंग होणार नाही , याची दक्षता देणेबाबतचे सुचना देण्यात आलेल्या आहेत. 

💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💢सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत भेट 38% महागाई भत्ता मिळणार येथे वाचा

💢शिक्षक बदली बाबत अपडेट येथे वाचा

💢५४ वर्ष वय किंवा ३० वर्ष नोकरी यापैकी जो कार्यकाल आज झाला तो कार्यकाल सेवा निवृत्त काळ याबाबत आदेशयेथे वाचा  

Post a Comment

0 Comments