दिवाळी हा सण खूप महत्वाचा सण आहे तो सर्वत्र हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळी व ईद सणानिमित्त कर्मचाऱ्यांना सण अग्रिम तसेच बोनस जाहीर करण्यात येते. दर वर्षी दिवाळी अग्रीम रक्कम बिनव्याजी देत असल्याने , कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळामध्ये मोठा आर्थिक दिलासा मिळत असतो. सदर सण अग्रिम रक्कमाची वसुली कर्मचाऱ्यांच्या 10 समान हप्त्यामध्ये करण्यात येते. सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना 12,500/- रुपये दिवाळी सण अग्रिम जाहीर करण्यात येते . परंतू कोरोना महामारी नंतर प्रथमच दिवाळी साजरी करतांना कोणतेही निर्बंध राहणार नाही. महाराष्ट्रात या वर्षी शिंदे सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत सण अग्रीम वाढवून देऊन दिवाळीची मोठी भेट देणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील मनपा अंतर्गत कार्यरत कर्मचारी , महापालिकेचे शिक्षक , तसेच बेस्टचे कर्मचाऱ्यांना यांना दिवाळी सणानिमित्त बोनस जाहीर करण्यात आले आहे .या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी 22,500/- रुपये बोनस जाहीर करण्यात आले आहे .त्याचबरोबर आरोग्य सेविकांना त्यांच्या मासिक पगाराच्या एक पगार दिवाळी बोनस म्हणुन म्हणुन जाहीर करण्यात आली आहे . याबाबतीत संदर्भातील अधिकृत्त घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली आहे .त्याचबरोबर मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्याचबरोबर अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देखिल बोनस जाहीर करण्यात आला आहे .
सध्या शिंदे सरकार मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने , कर्मचाऱ्यांच्या बोनस मध्ये वाढ करुन कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडुन खुश करण्यात प्रयत्न करत आहे .राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करुन म्हणाले कि , आनंदात दिवाळी साजरा करा .शिवाय कोरोना कालावधी मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले .
राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा दिवाळी सण अग्रिममध्ये वाढ करण्याची मागणी राज्य कर्मचाऱ्यांकडुन करण्यात आली असल्याने , सरकारकडुन यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेणार आहे . सदर मागणी मध्ये कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सण अग्रिममध्ये वाढ करुन 20,000/- रुपये अग्रिम मंजुर करण्यात यावा असे नमुद करण्यात आले असून शिंदे सरकार याबाबत सकारात्मक असून दोन दिवसात निर्णय जाहीर करण्यात येणार आहे असे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
💢गुड न्यूज...राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर,दिवाळी आधीच 38% प्रमाणे महागाई भत्ता.सविस्तर माहितीयेथे वाचा
💢 ५४ वर्ष वय किंवा ३० वर्ष नोकरी यापैकी जो कार्यकाल आज झाला तो कार्यकाल सेवा निवृत्त काळ याबाबत आदेशयेथे बघा
💟शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
1 Comments
आधी वेतनाला तरतूद उपलब्ध करून द्यायचं बघा, 3-4 महिन्यांपासून पगार नाही.
ReplyDelete